पुणे: कोरोनाची स्थिती नियंत्रणात पण...; काय म्हणाले जिल्हाधिकारी?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण आणि कोरोना लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला.

पुणे : कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. तसेच, 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत बालकांना पोलिओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

Farmers Protest: बारामतीतील व्यापारी-व्यावसायिकांचा 'भारत बंद'ला पाठिंबा​

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण आणि कोरोना लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी​

डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी आताही धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. तसेच, पुढील कालावधीत रुग्णसंख्या वाढल्यास प्रशासनाने तयारी ठेवावी. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच लसीकरणासाठी माहिती संकलित करताना अचूकता ठेवावी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी कोरोना स्थिती आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk of corona remains high said Pune District Collector Dr Rajesh Deshmukh