Farmers Protest: बारामतीतील व्यापारी-व्यावसायिकांचा 'भारत बंद'ला पाठिंबा

Farmers_Protest
Farmers_Protest

बारामती : शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी मंगळवारी (ता.८) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये बारामतीतील व्यापारी, आडते, फळे आणि भाजीपाला व्यावसायिकही सहभागी होणार आहेत.

मंगळवारी बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई बंद राहणार असल्याची माहिती सोमवारी (ता.७) देण्यात आली. दरम्यान बारामती व्यापारी महासंघाने सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. 

बारामतीतील गणेश मार्केट बंद राहणार
दरम्यान बारामतीतील गणेश मार्केट भाजी मंडई संघटनेकडून तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देत मंगळवारच्या बंदमध्ये सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले. संघटनेकडून चिऊशेठ जंजीरे, बबलू बागवान, गणेश कदम, ज्ञानेश्वर गवळी आदींनी निवेदन दिले. केंद्राचा कृषि कायदा शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही या बंदमध्ये सहभागी होत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

बाजार समितीही बंद राहणार
शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद राहणार असल्याचे सभापती अनिल खलाटे, सचिव अरविंद जगताप आणि मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी सांगितले. 

संभाजी ब्रिगेडही आक्रमक...
सोमवारी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने बारामती येथे प्रशासकीय भवना समोर शेतकरी विरोधी कृषी विधेयक कायदे रद्द करावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही थांबवावी, या मागणीसाठी दगड रूपी केंद्र सरकारला पुष्पहार घालून आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा सचिव विनोद जगताप, कांतीलाल काळकुटे रमेश चव्हाण, तुषार तुपे, योगेश जगताप मकरंद जगताप सोमनाथ जाधव, कार्याध्यक्ष मयुर जाधव, शुभम चव्हाण, बबन पवार, अजित चव्हाण, दत्तात्रय जाधव, राहुल मोरे, सोमनाथ भोसले, अभिजीत जाधव उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com