'स्मार्ट' पुण्यात 100 किमी फिरा... फक्त खड्डेच खड्डे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुण्यात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या उभारणीला प्रचंड वेग आल्याचा दावा केला जात आहे. परंतु, शहरात शंभर किलोमीटरच्या रस्त्यांना खड्ड्यांनी घेरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड-दोन वर्षांत बांधलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे गंभीर अपघातही घडले आहेत. दुसरीकडे रस्त्यांच्या बांधणीसाठी महापालिका वर्षाकाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा हिशेब दाखवते आहे.

पुणे : पुण्यात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या उभारणीला प्रचंड वेग आल्याचा दावा केला जात आहे. परंतु, शहरात शंभर किलोमीटरच्या रस्त्यांना खड्ड्यांनी घेरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड-दोन वर्षांत बांधलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे गंभीर अपघातही घडले आहेत. दुसरीकडे रस्त्यांच्या बांधणीसाठी महापालिका वर्षाकाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा हिशेब दाखवते आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शहरात सुमारे १ हजार ८०० किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यात १३०० किलोमीटरचे डांबरी आणि ५०० किलोमीटरचे रस्ते काँक्रीटचे आहेत. त्यापैकी वर्षाला किमान दीडशे किलोमीटरच्या नव्या रस्त्यांची बांधणी होते, तर काही जवळपास तीनशे किलोमीटरच्या रस्त्यांची डागडुजी केली जाते. मुळात बांधणीदरम्यान दर्जाच राखला जात नाही. त्यामुळे रस्तोरस्ते खड्डे दिसून येत आहेत. बहुतांश भागांत डांबरी रस्त्यांवरील खडी आणि डांबर वाहून गेले आहे. तरीही, वाहनांची वाहतूक सुरू राहिल्याने रस्ते आणखी खराब झाले आहेत. तर, काँक्रीटचे रस्ते समपातळीत नसल्याने तेही धोकादायक झाल्याचे चित्र आहे. त्याशिवाय, महापालिकेत दोन वर्षांपूर्वी समावेश झालेल्या जवळपास ५० किलोमीटर रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याच्या दुरुस्तीची योजना महापालिकेकडे तूर्तास नाही.

चंद्रकांत दादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत- उद्धव ठाकरे

‘पीएमआरडीए’ क्षेत्रात खड्ड्यांतून वाहतूक
‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रातील आठ तालुक्‍यांत हवेली, मुळशी, भोर-वेल्हा, खेड, आंबेगाव आदी ठिकाणी जिल्हा मार्गांवर खड्डे पडले आहेत. चार महिने अशाच अवस्थेत वाहतूक सुरू आहे. दुरुस्तीच्या दृष्टीने कार्यवाही झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे वर्षाला १० ते १२ कोटी रुपये खर्चून ही कामे होतात. याशिवाय, मुख्यमंत्री रस्तेविकास योजनेचा निधी वापरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road hole in 100 kilometer road