Ganesh Chaturthi: संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाली दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे
Ganesh Chaturthi
Ganesh ChaturthiEsakal

राज्यात मोठ्या शहरांपासून खेडोपाड्यापर्यंत गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मुंबई पुण्यातही गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळतो. बाहेरून लोक पुणे, मुंबईला गणेशोत्सव सोहळा पाहण्यासाठी येत असतात. पुण्यात सकाळपासून मोठा उत्साह दिसून आला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील मानाच्या गणपतीचीही प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे. मोठ्या मिरवणूका काढण्यात येत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचीही सकाळी प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.

Ganesh Chaturthi
CM शिंदे, राज ठाकरेसह 'या' नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन; पाहा फोटो

दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली होती. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती करण्यात आली त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुलं करण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi: 'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, एकनाथ शिंदेंची गणेशाचरणी प्रार्थना!

दरम्यान गणेशोत्सवासाठी पुणे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात 7 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या दरम्यान अनपेक्षित घटना घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्हीही असणार आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com