महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

महिला-पुरूषांमधील रोजगारामध्ये आर्थिक विषमता आहे. त्यामुळे 'समान काम, समान वेतन' लागू होण्याची गरज आहे.

पुणे : देशात महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक विषमता ही चिंतेची बाब असून, अशा घटनांमुळे मनाला वेदना होतात. ही परिस्थिती सुधारून महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दृष्टि स्त्री प्रबोधन केंद्राने केलेल्या देशव्यापी अध्ययन अहवाल 'स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया' याचा लोकार्पण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांच्या उपस्थितीत पार पडला. बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी (ता. 13) आयोजित या कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, दृष्टि स्त्री प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा गीता गोखले, सचिव डॉ. अंजली देशपांडे, प्रकल्प निर्देशक डॉ. मनीषा कोठेकर उपस्थित होत्या.

- विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदा शाळांना 128 दिवस सुट्ट्या!

कृष्णगोपाल म्हणाले, दृष्टि स्त्री प्रबोधन केंद्राने देशाच्या विविध स्तरांमधील महिलांच्या समस्यांबाबत शास्त्रीय अभ्यास केला आहे. या सर्वेक्षणात महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची स्थितीवर भर देण्यात आला आहे. 'दृष्टि'चे हे कार्य कौतुकास्पद आहे. या सर्वेक्षणातून मांडलेल्या निष्कर्षानुसार महिलामंधील साक्षरतेचे प्रमाण वाढते आहे. 90 टक्‍के महिलांकडे आधारकार्ड असून, 80 टक्‍के महिलांचे बॅंकेत खाते आहे, ही बाब समाधानकारक आहे. 

- Video : स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार इंटरनॅशनल फेस्टिव्हल!

परंतु महिला-पुरूषांमधील रोजगारामध्ये आर्थिक विषमता आहे. त्यामुळे 'समान काम, समान वेतन' लागू होण्याची गरज आहे. परंतु त्यात विलंब होत आहे. दरम्यान, 79 टक्‍के महिलांनी पतीसमवेत वाद होत नाही. तर, 84 टक्‍के महिलांनी घरात छळ होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच चित्र काही वाईट नसून आशावादी परिस्थिती आहे.

- मोदींवरील वादग्रस्त पुस्तकावर अमोल कोल्हे काय म्हणाले?

कुलगुरू वंजारी म्हणाल्या, महिलांच्या शैक्षणिक विकासासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. महिलांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी विद्यापीठाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. सूत्रसंचालन सविता काजरेकर यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS joint general secretary Krishnagopal said that persecution of women is matter of concern