पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा! जिल्ह्याधिकारांनी केले आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rumors in the market that there will be a lockdown again

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यानंतर टप्याटप्प्याने बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या. दरम्यान जुलै महिन्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन प्रशासनाकडून अचानक पुकारण्यात आला.​

पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा! जिल्ह्याधिकारांनी केले आवाहन

पुणे : "पुढील महिन्यात पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. त्यामुळे आताच सामान भरून घ्या, अशा प्रकाराच्या अफवा काही व्यापाऱ्यांकडून पसरविल्या जात असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याचा फायदा घेत जादा दराने देखील वस्तूंची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विनाकारण अनेक दुकानांमध्ये गर्दी होऊ लागल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. 

करु का अजितदादांना फोन; प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यानंतर टप्याटप्प्याने बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या. दरम्यान जुलै महिन्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन प्रशासनाकडून अचानक पुकारण्यात आला. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने टप्याटप्प्याने बाजारपेठे सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बाजारपेठा आणि व्यवहार सुरळीत होऊ लागले असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा सध्या शहरात पसरली आहे. त्यातून नागरिकांमध्ये विनाकारण घबराटीचे वातावरण पसरविले जात आहे. पुन्हा लॉकडाऊन होणार का, असे अनेक फोन सकाळ कार्यालयात येत आहेत. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत माहिती घेतल्यानंतर काही व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दोन सप्टेंबरनंतर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे, असा अपप्रचार केला जात आहे. त्यातून दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. तसेच याचा फायदा घेत जादा दराने वस्तूंची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी देखील सकाळकडे आल्या आहेत. त्यातून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. 

आज सकाळी मार्केटयार्ड येथे खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. आताच माल भरून घ्या, असे तेथील व्यापाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे दुकानात देखील मोठी गर्दी झाली होती. माल विकताना देखील काही वस्तूंचे दर हे जादा लावण्यात आले असल्याचे दिसून आले. 
- संगीता माळवे (गृहिणी) 

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद


पुन्हा लॉकडाऊन होणार आहे, अशी अफवा जर कोणी पसरवीत असेल, तर त्यावर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये. अशा अफवा कोणी पसरवीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. विनाकारण नागरिकांनी गर्दी करू नये. गर्दी जाणेही टाळावे. 
- डॉ. राजेश देशमुख (जिल्हाधिकारी ) 

Web Title: Rumors Market There Will Be Lockdown Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top