इंदापूर क्रीडा संकुलाचा बदलला चेहरामोहरा ; अशी घेतली जिल्ह्यात भरारी

A running ground has been set up at Indapur Taluka Sports Complex.jpg
A running ground has been set up at Indapur Taluka Sports Complex.jpg

इंदापूर (पुणे) : ग्रामीण भागात खेळाचा प्रचार, प्रसार व्हावा. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, सर्वसामान्य माणसाचे आरोग्य सुदृढ व्हावे याकरिता शासनाने तालुका क्रीडा संकुलांची निर्मिती केली. त्यानुसार इंदापूरमध्ये देखील तालुका क्रीडा संकुल झाले. मात्र या संकुलास काही वर्षापासून मरगळ आली होती. मात्र महेश चावले हे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून इंदापूरला आल्यानंतर इंदापूर तालुका क्रीडा संकुलाने जिल्ह्यात भरारी घेतली आहे.

सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन राज्य मंत्री, आमदार तथा इंदापूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, इंदापूर तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. चावले यांनी इंदापूर क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलला आहे.

सध्या या संकुलांमध्ये साफसफाई, मैदान दुरुस्ती व सपाटीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग, विद्युतीकरण, पाईपलाईन, विविध खेळ मैदानांची दुरुस्ती, मिनीस्टेडियम बॅडमिंटन हॉल, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकआदर्शक्रीडा संकुल म्हणून इंदापूर क्रीडा संकुल ओळखले जात आहे. त्यामुळे डॉक्टर्स, ग्रामीण व शहरी भागातील युवापिढी व नागरिक सुविधेचा लाभ घेत आहेत.

या कामामुळे संकुलामध्ये सकाळी व संध्याकाळी व्यायाम करणाऱ्यांची गर्दी वाढली असून त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील काळात संकुलामध्ये वसतीगृह, बास्केटबॉल, जिम, जलतरण इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com