रुपी बँकेचे लवकरच होणार सारस्वत बँकेत विलीनीकरण

रिजर्व बँकेच्या रोज निघणाऱ्या परिपत्रकामुळे उपचार पेक्षा आजार बरा अशी आमची स्थिती झाली पाहिजे
rupee bank merge to sarswat bank
rupee bank merge to sarswat banksakal

पुणे : रुपी बँकेचे(Rupee Co-operative Bank) लवकरच सारस्वत बँकेत(sarswat bank ) विलीनीकरण करण्यासाठी रिजर्व बँकेने(RBI) तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच ही प्रक्रिया पार पडेल, बँकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड(union state minister dr. bhagwat karad) यांनी दिले.

rupee bank merge to sarswat bank
कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केला पुणे दौरा

नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात आयोजित बँकिंग वार्तालापात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, निमंत्रक सचिन इटकर, भरत गीते, संवादचे अध्यक्ष सुनील महाजन आदी उपस्थित होते. अनास्कर म्हणाले, " सहकारी बँकांचे म्हणणे आजवर कोणी एकूण घेत नव्हते. आमचं दुखणं समजून आमच्यावर उपचार करायला हवे. रिजर्व बँकेच्या रोज निघणाऱ्या परिपत्रकामुळे उपचार पेक्षा आजार बरा अशी आमची स्थिती झाली पाहिजे. सहकार बँकिंग क्षेत्र टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकांचे अर्थव्यवस्थेत पैसे आणण्याचे काम नागरी सहकारी बँका करतात, राष्ट्रीय बँक नाही. आम्हाला शिस्त लावा पण बँक जिवंत ठेऊन."

rupee bank merge to sarswat bank
संसर्ग अधिक, आजार सौम्य; ओमिक्रॉन झाल्यास अशी घ्या काळजी

विद्याधर अनास्कर यांच्यासह उपस्थित सहकारी बँकांच्या अध्यक्षांनी समस्या मांडल्या, या समस्या मार्गी लावण्यासाठी सहकार मंत्र्यांसोबत बैठक घेऊ. सहकारी बँका सक्षम आणि पारदर्शक होण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय चर्चा करून घेऊ, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले.

'सकाळ'च्या निवेदनासंबंधी लवकरच बैठक

सहकार क्षेत्रातील अडचणीसंबंधी पुण्यातच सकाळ माध्यम समूहाने सहकार परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेतील चर्चेचे निवेदन मला २० डिसेंम्बर रोजी मिळाले आहे. लवकरच त्यावर बैठक आयोजित करण्यात येईल. त्यात केलेल्या सहकार संबंधीच्या सूचना लवकर अमलात येतील, अशी माहिती डॉ.कराड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com