esakal | पुरंदर : संत निवृत्ती महाराज खळदकर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर : संत निवृत्ती महाराज खळदकर यांचे निधन

शिवकालीन परंपरेनुसार खळद पंचक्रोशीमध्ये संत भुतोजी महाराज एक महान विभूती होऊन गेली असून, दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापुर या ठिकाणी अवघड अशा मुंगी घाटातून ते कावड घेऊन जात होते.

पुरंदर : संत निवृत्ती महाराज खळदकर यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

खळद : पुरंदर तालुक्यातील खळद, खानवडी, एखतपुर, मुजवडी, कुंभारवळण पंचक्रोशीचे भूषण संत तेल्या भुताच्या मानाच्या कावडीचे मानकरी निवृत्ती महाराज खळदकर (वय ७२) यांचे पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

शिवकालीन परंपरेनुसार खळद पंचक्रोशीमध्ये संत भुतोजी महाराज एक महान विभूती होऊन गेली असून, दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापुर या ठिकाणी अवघड अशा मुंगी घाटातून ते कावड घेऊन जात होते.

यावेळी ते यात्रेला जाताना आपल्या संपूर्ण घरादाराला अग्नी देऊन जात होते व ज्यावेळी ते पुन्हा परत येतात त्यावेळी त्यांचे घर पूर्ववत होत असे ही कथा या भागात प्रचलित आहे.

आजही एखतपूर येथून जळत्या घराच्या जागेवरती महाआरती करून, भुतोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रामनवमीच्या दिवशी तेल्या भुत्याची कावड पायी वारीने क-हा नदीचे पवित्र जल घेऊन शिखर शिंगणापूरला नेण्याची परंपरा सुरू आहे.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

याच वंशपरंपरेतून निवृत्ती महाराज खळदकर हे त्यांचे वडील बाजीराव महाराज खळदकर यांच्या निधनानंतर १९९० पासून गेली तीस वर्षे कावडीची परंपरा सांभाळत होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपुर्ण पंचक्रोशीत,शिखर शिंगणापूर परीसरात शोककळा पसरली असून, शिवभक्त हळहळ व्यक्त करीत आहेत. निवृत्ती महाराज खळदकर यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image
go to top