रोटी वनक्षेत्रात पाणवठा उभारा (व्हिडिओ)

अमर परदेशी
शनिवार, 5 मे 2018

वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची सूचना; 'सकाळ'च्या वृत्ताची दखल

पाटस (पुणे): दौंड तालुक्‍यातील रोटी वनक्षेत्रात एकही पाणवठा नसल्याने उन्हाळ्यात वन्यजीवांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे वन विभागाच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी व सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी रोटी वनक्षेत्रात तत्काळ पाणवठा करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी, अशी सूचना दौंड तालुका वन परिमंडल अधिकारी महादेव हजारे यांना केली आहे.

दै. "सकाळ'मध्ये रोटी वनक्षेत्रात पाणवठ्यांची गरज या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. तालुक्‍यातील रोटी हद्दीत साठ एकरांपेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. यामध्ये कोल्हा, ससे, मोर आदी वन्यप्राण्यांच्या तुलनेत हरणांची संख्या लक्षणीय आहे. या क्षेत्राला लागून हिंगणीगाडा वनक्षेत्रात केवळ कमी क्षमतेचा एकच पाणवठा आहे. त्यातही वेळेवर पाणी सोडले जात नाही. मात्र, रोटी वनक्षेत्रात एकही पाणवठा करण्यात आला नाही. त्यामुळे वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करता येत नाही. सध्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्यासाठी वन्यजीवांचा जीव कासावीस होत आहे. वनक्षेत्रात पाणी नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी लांबवर भटकंती होत आहे. रोटी घाटातील एका डबक्‍यातील दूषित पाण्यावर हरणांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्यामुळे विषबाधा होऊन हरणांच्या जिवाला धोका संभवत आहे.

दरम्यान, वनक्षेत्रात मद्यपींसह प्रेमीयुगलांचा वावर वाढला आहे. याचा वन्यजीवांना मोठा उपद्रव होत आहे.

सात हजार क्षमतेचा पाणवठाः पवार
दौंड तालुका वन परिमंडल अधिकारी महादेव हजारे यांच्या आदेशावरून वन परिमंडल अधिकारी अशोक पवार यांनी गुरुवारी (ता. 3) दुपारी वनक्षेत्रात पाणवठ्यासाठी जागा पाहणी केली. दरम्यान, पाणवठ्यांचे लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. प्राण्यांच्या सोयीचा विचार करून सात हजार पाणी साठवण क्षमतेचा बशीच्या आकाराचा कृत्रिम पाणवठा करण्यात येणार असल्याचे वन परिमंडल पवार यांनी सांगितले.

Web Title: sakal impact raising water in roti forest