Sakal Impact : साखर आयुक्तांच्या सूचना.... अन् तातडीने झाली तब्बल सहाशे मेट्रिक टन ऊसाची तोडणी

सिंहगड परिसरातील शेतकऱ्यांनी मानले सकाळ'चे आभार; पुढील वर्षी शेतकऱ्यांची अगोदरच नोंदणी करणार असल्याची कारखान्याची माहिती
sakal impact shekhar gaikwad Six hundred metric tons of sugarcane cut farmer agriculture
sakal impact shekhar gaikwad Six hundred metric tons of sugarcane cut farmer agriculturesakal

सिंहगड : तोडीचा कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा असल्याने शेतकरी चिंतेत असल्याबाबतची बातमी सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तातडीने संत तुकाराम सहकारी साखर कारखाण्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना ऊस घेऊन जाण्याबाबत सूचना दिल्या.

कारखाण्याचे व्यवस्थापकीय संचालक साहेबराव पठारे यांनी तात्काळ दखल घेत मुख्य शेतकी अधिकारी राजेंद्र वनवे, गट कृषी अधिकारी शहाजहान मुजावर, समीर खोपकर यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड मजुरांची टोळी पाठवून मागील पंचवीस ते तीस दिवसांत तब्बल सहाशे मेट्रिक टन ऊसाची तोडणी पूर्ण करुन घेतली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सकाळ'चे आभार मानले आहेत.

सिंहगड परिसरातील गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सोनापूर, रुळे, बहुली या गावांतील शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्यास कारखाण्यांकडून टाळाटाळ सुरू होती. ऊस तोडण्यास विलंब झाल्याने अक्षरशः ऊसाला तुरे आले होते. तसेच फुटवे फुटण्यास सुरुवात झाली होती. मोठा खर्च व मेहनत करून वाढवलेला ऊस पडून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

काही शेतकऱ्यांनी नाइलाजाने कमी पैशांमध्ये दुग्ध व्यावसायिकांना चाऱ्यासाठी ऊस विकून टाकला. याबाबत काही शेतकऱ्यांनी सकाळ'शी संपर्क करुन आपल्या व्यथा मांडल्यानंतर याकडे साखर आयुक्त व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सूचनेनुसार तातडीने या भागातील ऊसाची तोडणी सुरू झाली व तब्बल सहाशे मेट्रिक टन ऊस कारखान्याने नेला आहे.

"आम्ही अनेक दिवस पाठपुरावा करत होतो परंतु कारखाण्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. सकाळ'मधून बातमी आल्यानंतर तातडीने दखल घेण्यात आली त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सकाळ'चे आभार. यापुढे संबंधित कारखाण्यांनी आगाऊ नोंदणी करुन घ्यावी म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही."

- सुशांत खिरीड, ग्रा.पं. सदस्य, गोऱ्हे बुद्रुक.

"कारखाण्याने वेळेत ऊस नेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही तसेच या भागातील ऊसाचे क्षेत्रही वाढेल. संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांचेही आभार."

- विनोद पाबेकर, शेतकरी, सोनापूर.

"साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सूचनेनुसार आम्ही तात्काळ कार्यवाही करत ऊसतोडणी करुन घेतली. सकाळ'मुळे या शेकऱ्यांबाबत आम्हाला माहिती मिळाली. पुढील वर्षी या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कारखाण्याशी संपर्क करुन अगोदरच ही प्रक्रिया पूर्ण करावी."

- साहेबराव पठारे, व्यवस्थापकीय संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, मुळशी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com