Sakal Maha Conclave : हर्षवर्धन नेहमी माझं डोकं खातो; सहकार महापरिषदेत शहांनी सांगितलं कारण

सहकार क्षेत्रावर अन्याय होतो, अशी तक्रार नेहमी केली जाते. मात्र, या तक्रारीत तथ्य नाही, असे शहा म्हणाले.
Amit Shah
Amit ShahSakal

Sakal Maha Conclave : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची मोठी ताकद आहे. महाराष्ट्रातून देशभरात सहकार क्षेत्र पोहोचण्यास मदत झाली असून देशातील सहकारात महाराष्ट्र आघाडीवर आहे असे विधान केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. ते सकाळ समुहाकडून पुण्यात आयोजित सहकार परिषदेत बोलत होते.

Amit Shah
Shivsena Row : भाजपनं ED, CBI नंतर EC ला कच्छपी लावलं; अंधारे पुन्हा बरसल्या

यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतचा एक किस्सादेखील सांगितले. शाह म्हणाले की, हर्षवर्धन पाटील नेमही माझं डोकं खातात की, इथेनॉलसाठी अर्थसहाय्य मिळत नाही. मात्र, काही सारख कारखान्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. मात्र, NCDC ने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना थेट राज्य सरकारकडून अर्थ साहाय्य करण्याचा निर्णंय घेतला.

Amit Shah
Smartphone Charge With Urine : आला नवा रँचो, मुत्रविसर्जनातून करणार मोबाईल चार्ज

याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कॉऑपरेटिव्ह सारख कारखान्यांच्या नॉर्मला थोडा दिलासा देत सरळ पद्धतीने कर्ज मिळेल यासाठी प्रयत्न करत असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.

पुढील दशकात सहकारिता क्षेत्र मोलाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादनदेखील शहा यांनी यावेळी केले. सहकार क्षेत्रावर अन्याय होतो, अशी तक्रार नेहमी केली जाते. पण आम्ही कर कमी केले आहेत. या तक्रारीत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी यावेळी केला.

Amit Shah
Elon Musk : 'पेड ब्लू टिक' नंतर मस्कचा यूजर्सना आणखी एक झटका; 'या' सेवेसाठी द्यावे लागणार पैसे

सहकारासाठी आम्ही विद्यापीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रावर अन्याय केला जातोय अशा आरोपांमध्ये तथ्य नाही. सहकार क्षेत्राला पहिल्यांदा टॅक्समध्ये फायदा मिळाला आहे. याशिवाय सेंद्रीय शेती करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करायला मोठी अडचण येते. आम्ही सहकारी तत्वावर अशी यंत्रणा निर्माण करत आहोत, जी शेतकऱ्यांना थेट परदेशात आपला भाजी विकता येईल, असं शहा यांनी म्हटलं.

शिवाय २० टक्के इथेनॉल मिक्स करण्याचं आश्वासन दिलेलं असून सध्या आपण १२ टक्के मिक्स करत आहोत. त्यामुळे साखर कारखान्यांना लाभ होणार असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

Amit Shah
Shivsena Row : उद्धव ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाउलं; ओपनकारमध्ये केलं कार्यकर्त्यांना संबोधित

सहकार हा मुख्यत्वे राज्याचा विषय. आज सहकाराची चर्चा होते तेव्हा त्यात काय होणार असा प्रश्न विचारला जातो. मात्र २१ टक्के साखर सहकारी संस्थांमधून निर्मित होते. दूध-गहू सहकारातून खरेदी होते.

धान्याची खरेदी सहकारी संस्थांकडून होते. ग्रामीण अर्थकारणाला सहकार चालना देते आणि मोठे करते. सहकार क्षेत्र बिनकामाचं होतंय असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तस कधीच होणार नाही. याउलट पुढील दशकात सहकारिता क्षेत्र मोलाची भूमिका निभावणार असल्याचं ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com