Sakal Vidya Education Expo : सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचा बारामतीत समारोप

दोन दिवसाच्या या एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील शैक्षणिक संधीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले गेले.
Sakal Vidya Education Expo
Sakal Vidya Education Exposakal

Sakal Vidya Education Expo - आचार्य अँकेडमी प्रस्तुत एस.बी. पाटील विकास प्रतिष्ठान व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आयोजित सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचा रविवारी (ता. 11) बारामतीत समारोप झाला.

Sakal Vidya Education Expo
Pune : कात्रजच्या संस्कृती आर्ट्स ग्रुपचा हिमाचल प्रदेशात डंका

दोन दिवसाच्या या एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील शैक्षणिक संधीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले गेले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बारामतीतील पालक व विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध क्षेत्रातील संधी बाबत नवीन माहिती मिळाली.

दरम्यान शनिवारी (ता. 10) करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी दहावी बारावी नंतर करिअर निवडताना काय काळजी घ्यायला हवी, या बाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दहावीच्या गुणांना महत्व तर आहेच पण लगेचच अकरावी व बारावीची तयारी गरजेची आहे.

Sakal Vidya Education Expo
Mumbai : उन्हाळ्यात माथेरानची राणी सुसाट! अवघ्या तीन महिन्यात मध्य रेल्वेची १.०१ कोटींची कमाई!

केवळ विद्यार्थीच नाही तर पालकांनाही योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, सीईटी, नीट, जेईई या परिक्षांचे फॉर्म भरताना योग्य काळजी घ्यायला हवी. एनडीए सारख्या क्षेत्रात मुलीही करिअर करु शकतात, योग्य तयारी केल्यास काहीही अशक्य नाही. प्रवेशाची तयारी करताना कागदपत्रांची योग्य जुळवणी करणेही तितकेच गरजेचे आहे.

रविवारच्या सत्रात आचार्य अँकेडमीचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी करिअर कसे निवडावे या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, आवडते ते काम करणे म्हणजेच करिअर. प्रत्येकाने आपल्या आवडत्या विषयावर करिअर करणे आवश्यक आहे. बदलत्या काळात आपल्या आवडत्या छंदातूनही तुम्ही अर्थार्जन करु शकता, करिअर निवडताना केवळ पैसे मिळविणे हाच उद्देश नको तर त्यातून आनंदही शोधता यायला हवा. सकारात्मक विचार करायला हवा तरच आयुष्यात काहीतरी बनता येईल.

Sakal Vidya Education Expo
Baramati Crime: बारामतीत चोरांचा सुळसुळाट; भरदिवसा घरफोडी, लाखोंचे दागिने चोरीला

कार्व्हर एव्हिएशनच्या शिवानी पोतेकर यांनी वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात मुलांसोबत मुलीही आपले करिअर करु शकतात, वैमानिकांना सध्या मोठी मागणी असून देशांतर्गत एव्हीएशन क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत असल्याने या क्षेत्रात करिअरसाठी मोठा वाव असल्याचे सांगितले.

करिअर मार्गदर्शक शब्दधन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज वाबळे यांनीही विद्यार्थ्यांना या प्रसंगी करिअर मार्गदर्शन केले.

अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या महेश फुले यांनी देखील रिटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील विविध संधीबाबत या प्रसंगी माहिती दिली. या क्षेत्रात मोठी मागणी असून विद्यार्थी एका वेगळ्या विषयात करिअर करु शकतात असे ते म्हणाले.

दरम्यान या एक्स्पोमध्ये सहभागी सर्वच संस्थाचालकांचा सत्कार सकाळचे प्रतिनिधी दत्तात्रय मारकड, रमेश शिंदे, मनोज काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Sakal Vidya Education Expo
Mumbai : उन्हाळ्यात माथेरानची राणी सुसाट! अवघ्या तीन महिन्यात मध्य रेल्वेची १.०१ कोटींची कमाई!

नवीन माहिती मिळाली.

या एक्स्पोच्या माध्यमातून शैक्षणिक कर्जासह, वैमानिक प्रशिक्षण, एअरक्राफ्ट मेन्टेनन्स, जेईई, नीट, सीईटी, परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठीच्या संधी, अँनिमेशन, फार्मसी, सैनिकी शिक्षण यासह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या भरपूर संधी आहेत, याची माहिती मिळाल्याची भावना पालकांनी बोलून दाखवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com