‘बाप्पाची मूषकसेना’तून सेवाव्रतींना सलाम; चितळेबंधू मिठाईवाले यांच्यातर्फे उपक्रम

Bappachi-Mushaksena
Bappachi-Mushaksena

पुणे - कोरोना संकटकाळात समाजभान ठेवून अथकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना सलाम करण्यासाठी गणेशोत्सवात #बाप्पाचीमूषकसेना हा विशेष उपक्रम चितळेबंधू मिठाईवाले यांच्यातर्फे राबवण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सव तसेच इतर सामाजिक कार्यामध्ये कार्यकर्ता हा खरंतर अतिशय महत्त्वाचा घटक आहे, मात्र तो बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. समाजकार्यात या कार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा, त्यांच्या कामाला मानवंदना देण्याचा प्रयत्न  #बाप्पाचीमूषकसेना या उपक्रमातून करण्यात आला. शॉर्टफिल्म आणि फेसबुक, इन्स्टाग्राम अशा प्रकारच्या समाज माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याविषयी चितळेबंधूचे भागीदार संजय चितळे म्हणाले, ‘‘या उपक्रमाद्वारे कठीण काळात इतरांच्या मदतीला धावून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या अद्वितीय कामगिरीची माहिती जनमानसापर्यंत पोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला.’

भागीदार केदार चितळे म्हणाले, ‘‘कोणतेही सामाजिक कार्य तडीस नेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी मदत होते. हाच कार्यकर्ता कोरोनासारख्या भयंकर संकटात मदतीचा हात पुढे देताना दिसला. या कार्यकर्त्यांचे काम कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याने या उपक्रमाद्वारे आम्ही ते समाजापुढे ठळक करण्याचा प्रयत्न केला.’’

राज्यातील कार्यकर्त्यांचा समावेश
पुणे, मुंबईसह जळगाव, कोल्हापूर, सोलापूर अशा राज्यभरातील नागरिकांना कोरोनाकाळात प्रत्यक्षपणे मदत केलेल्या कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. यामध्ये जळगावचे फारुक शेख अब्दुल्ला, पुण्यातील समीर आणि प्राजक्ता रुपदे, तालगर्जना पथकाचे आत्मेश बोरकर, दीक्षा दिंडे, रुद्रांग ढोलताशा पथकाचे अमर भालेराव, मोशीतील प्रशांत सस्ते, कोल्हापूरचे संदीप धोंडिराम गायकवाड, कोल्हापूरचे किरणसिंह चव्हाण आणि त्यांचे परिवर्तन कला फाउंडेशन, रोहन घोरपडे, सोलापूरचे प्रसाद पवार यांचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com