Video: सचिन तेंडुलकरचा 'भारतरत्न' काढून घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

देशात सध्या शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही, असंही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केलं आहे. 

पुणे : सचिन तेंडुलकर भारतीय जनता पक्षाची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहे. अकलेचे तारे तोडणाऱ्या सचिनचा 'भारतरत्न' काढून घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य

शेतकरी स्व-संरक्षणासाठी आंदोलन करत आहे, हे दिसत नाही का? शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेतात जे धान्य पिकवलेले आहे, तेच खाता आणि त्यांच्याच विरोधात बोलता. तुमची बोलण्याची हिंमत तरी कशी होते? हे कळायला मार्ग नाही. ही मानसिक व वैचारिक गुलामी आहे.

शेतकरी जगाचा पोशिंदा असून त्याला सन्मानाची वागणूक आणि त्याच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. सरकारच्य नाही, तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. देशात सध्या शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही, असंही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केलं आहे. 

परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला​

दरम्यान, हॉलिवूड पॉप सिंगर रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक नामांकित सेलिब्रिटी पुढे आले. आणि त्यांनी मोदी सरकारला पाठिंबा दर्शवत आपापल्या भूमिका मांडल्या. सचिनने भारतातील लोक भारताला चांगल्या प्रकारे ओळखतात. आमच्या देशातील प्रश्न आम्ही सोडवू अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी सचिनवर चांगलंच फैलावर घेतलं आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade demanded that Sachin Tendulkar be stripped his Bharat Ratna