पुण्यात संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पुण्यात संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Published on: 

पुणे, ता. १४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, युवक संघटना आणि नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संभाजी महाराजांच्या पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. विविध ठिकाणी उपक्रमांद्वारे युवकांमध्ये इतिहासाविषयी जागृती निर्माण केली.
डेक्कन येथे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी काशिनाथ गायकवाड, गणेश लांडगे, वंदना पवार, दत्ता कांबळे, दत्ता डाडर, संतोष भोताळ आदी उपस्थित होते. अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीने संभाजी महाराजांच्या पुतळ्याला संस्थापक अध्यक्ष डॉ. अनुपम बेगी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महेंद्र चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, चेतन जेथे, भारत जाधव, पंकज खैरे, मनोज लालबिगे, श्याम खेरूचे उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष पर्वती मतदारसंघ व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुलटेकडी चौकात प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी बालाजी शेरला, महेश साळुंखे, दीपक शिपकुले, गणेश थिटे, उपेंद्र सरदेशपांडे आदी उपस्थित होते. दलित सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत बोले, काळूराम ससाणे, शशिकांत शेलार, प्रदीप गायकवाड, शशिकांत कांबळे, वैशाली कांबळे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे डेक्कन येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात शहराध्यक्ष युवराज दिसले, सरचिटणीस गणेश मापारी, महिला कार्याध्यक्ष मिलन पवार, तानाजी शिरोळे आदी उपस्थित होते.

काँग्रेस भवनमध्ये अभिवादन
शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे काँग्रेस भवन येथे समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी माजी नगरसेवक अजित दरेकर, उपाध्यक्षा प्राची दुधाणे, सरचिटणीस सीमा सावंत, प्रियांका मधाळे, ऋग्वेदिता सपकाळ, संदीप मोकाटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sambhaji Maharaj Literature Conference, Ramtek, Nagpur
Sardesai Wada in Kasba Sangameshwar
400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.
Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
Marathi News Esakal
www.esakal.com