दुसऱ्या लाटेचा अनुभव रोखेल तिसरी लाट!

दुसऱ्या लाटेने सर्वांनाच जबरदस्त धक्का दिला असून, अनेक नव्या गोष्टीही शिकवल्या आहेत. प्रशासन, आरोग्य यंत्रणा, खासगी रुग्णालये या सर्वांची परीक्षा या संकटाने घेतली.
Line For Vaccination
Line For VaccinationSakal

मोठ्या प्रयत्नांनी पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची (Second Wave) तीव्रता कमी करण्यात यश मिळत आहे. रुग्णांची (Patient) संख्या कमी झाली असली तरी धोका (Danger) संपलेला नाही. एका बाजूला पोस्ट कोविडमधील (Covid) ‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) सारख्या आजाराचे संकट (Crisis) आणि दुसरीकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार यामुळे आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांना वैयक्तिक पातळीवर अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त वेगाने लसीकरण (Vaccination) करणे हाच रामबाण उपाय ठरणार आहे. त्यासाठी केंद्र, राज्य आणि महापालिका यांनी एकमेकांचे पाय न खेचता एका दिशेने एकत्रित नियोजनाने काम केल्यास नागरिकांची फरफट नक्कीच थांबेल. (Sambhaji Patil Writes about Third Wave will Prevent the Experience Second Wave)

दुसऱ्या लाटेने सर्वांनाच जबरदस्त धक्का दिला असून, अनेक नव्या गोष्टीही शिकवल्या आहेत. प्रशासन, आरोग्य यंत्रणा, खासगी रुग्णालये या सर्वांची परीक्षा या संकटाने घेतली. एकट्या पुण्यात उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या ५५ हजारांवर पोचली. दररोज आठ हजार रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. ‘ब्रेक द चेन’ म्हणून लावलेले निर्बंध, झालेले लसीकरण, योग्य उपचारांमुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या यामुळे पुण्यातील रुग्णवाढीचा दर २०-२२ टक्‍क्‍यांनी कमी झाला. सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजारांपर्यंत खाली आली. आठ ते चौदा एप्रिल या आठवड्यात बाधितांची संख्या ३८ हजारांनी वाढली होती. तीच सहा ते बारा मे या आठवड्यात १५ हजारांपर्यंत खाली आली. परिस्थिती नक्कीच सुधारत आहे. पण आजही सरासरी सहा हजार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

Line For Vaccination
पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा...

पहिली लाट ओसरल्यानंतर दुसऱ्या लाटेचा अंदाज कोणाला आला नाही. पण आता दुसरी लाट कमी होतानाच तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. यात आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेसोबत नागरिकांना वैयक्तिक पातळीवरही अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यासोबतच कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. त्यांच्या औषधांचा खर्च कोणालाही न परवडणारा आहे. अशा वेळी नवे रुग्ण वाढणार नाहीत, लहान मुले बाधित होणार नाहीत आणि लागण झालेल्या रुग्णांना योग्य औषधोपचार मिळतील, अशा सर्वच पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. राज्य सरकारने १ जूनपर्यंत निर्बंध वाढविले. त्यानंतर पुढे काय होईल, हे आज तरी सांगणे कठीण आहे, अशावेळी लसीकरण या प्रभावी अस्त्राचा वापर अधिकाधिक करावा लागणार आहे.

सध्या लस उपलब्ध होण्यास अडचणी आहेत, पण जशी ती उपलब्ध होईल तशी प्राधान्यक्रम ठरवून नागरिकांना विनासायास मिळेल अशी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जी शहरे कोरोनाचा हॉटस्पॉट आहेत, तेथे लसीकरण वाढवायला हवे.

Line For Vaccination
तिसऱ्या लाटेचा विचार करुन नियोजन करा : अजित पवारांच्या सूचना

दुसऱ्या लाटेत

बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन अशा अनेक बाबतीत आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. तिसऱ्या लाटेत हा अनुभव येणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व त्रुटी दूर करून अधिक सज्ज राहावे लागेल. या सर्वांपासून बचावासाठी लसीकरण याच भरवशाचा पर्यायाला सर्वाधिक प्राधान्य द्यावे लागेल.

नागरिकांना आहे याची गरज...

  • बेडच्या उपलब्धतेची अचूक माहिती

  • दवाखान्यात उपचार नीट होत आहेत याचा भरवसा

  • रेमडेसिव्हिर, म्युकरमायकोसिस इंजेक्शनची कमी किमतीत उपलब्धता

  • पैसे उकळणाऱ्या रुग्णालयावर तत्काळ कारवाई

  • ससून रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया सोपी व जलद करणे

  • लसीकरण केंद्रांचे संस्था, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विकेंद्रीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com