सांगोल्यात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ११ गोवंश जनावरांची सुटका; एकास अटक

सांगोल्यात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ११ गोवंश जनावरांची सुटका; एकास अटक
Published on

कत्तलीसाठी नेले जाणारे
११ गोवंश ताब्यात

सांगोल्यात एकास अटक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला, ता. १९ : सांगोला शहरातील मार्केट यार्ड परिसरामागील भीमनगर भागात कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ११ गोवंश जनावरे ताब्यात घेत एकास अटक केली. या कारवाईत सुमारे ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगोला मार्केट यार्डच्या पाठीमागील भीमनगर परिसरात चिलाराच्या झाडाजवळ गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने दुपारी साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. यावेळी एमएच-१३-एएन-६५९७ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन आढळून आले. वाहनाच्या मागील भागात खिलार जातीच्या गायी दाटीवाटीने कोंबून लोखंडी अँगलला दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच लगतच्या झाडाला काही गोवंश जनावरे बांधलेली होती. त्यांच्यासाठी चारा, पाणी व औषधांची कोणतीही सुविधा नसल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी वाहन चालक अमर सतीश अवघडे (वय २१, रा. जुनोनी, ता. मंगळवेढा) यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ९ खिलार जातीच्या गायी, २ जर्शी गायी तसेच पिकअप वाहन असा एकूण सुमारे ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात प्राणी क्रूरता व संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com