
नागपूर पालिकेत दरोडे अन् मुंबई पालिकेतील...; राऊतांची फडणवीसांवर टीका
पुणे : भारतीय जनता पक्षा नामशेष होईल अशी चिड जनतेमध्ये आहे. आपण सगळ्यांनी अत्यंत जागरूकपणे काम करण्याची गरज असून, भाजपने अनेक महानगरपालिकांमधून प्रचंड लुटमार करण्यात आली. पुणे महापालिकाही त्यातून सुटली नसल्याचे म्हणत नागपूर महापालिकते दरोड्यांवर दरोडे पडत आहेत आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणतायत की, आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढू. पण गेली पन्नास वर्षे मराठी माणसाने मुंबई महापालिकेवरील भगवा खाली उतरवला नाही यातच सर्व काही आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलत होते. (Sanjay Raut Attack On Devendra Fadanvis In Pune)
हेही वाचा: भाऊ मुख्यमंत्री होताच त्रास सुरु झाला? राऊतांचा राज ठाकरेंना सवाल
पण आता मुंबई, ठाणे नाही तर, आता पुणे म्हणत पुणे तिथे काय उणे असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले आता त्यांची गोष्ट सोडून द्या. चंपाकली मुरझा गई है. चंपांना कोल्हापूरमध्ये कुणी विचारत नसून ते कोल्हापूरमध्येही पराभूत झाले आहेत. त्यात आता पुणेकर चंपी करणार आहेत. आपली हत्तीची चाल असून कोण काय म्हणतंय कोण काय करतंय यात पडायचं नाही. आपण बाळासाहेब ठाकरेंचे वाघ असून, आपण वाघा सारखं जगू असे राऊत म्हणाले. तयेच कुणी शेपटावर पाय ठेवला तर, सोडणार नाही आणि समोर आला तर, फडशा पाडू असेही राऊत यांनी स्पष्ट केलं. पुण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सावधतेने पाउलं टाकू असे ते म्हणाले.
हेही वाचा: आगीशी खेळू नका; CAA च्या विधानावर ममतांचे शहांना प्रत्युत्तर
गेल्या पंधरा वर्षात यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही पण भाऊ मुख्यमंत्री होताच त्यांना त्रास कसा सुरु झाला? असा सवाल राऊत यांनी यावेळी केला. लोक सध्या पेटवापेटवीची भाषा करत आहेत. कोणी करायची पेटवापेटवीची भाषा, आमचं आख्खं आयुष्य पेटवापेटवीत गेले असं म्हणत दारुगोळा शिवसेनेकडे असताना कसा काय पेटणार? पेटण्यासाठी आतून आग असावी लागते. मनगटात धग असावी लागते. पोलीस आले तेव्हा पेटवणारे पळून गेले. हा महाराष्ट्र आंड्या-पांड्यांचा नाही, लेच्यापेच्यांचा नाही. हा महाराष्ट्र शिवसेनेचा असल्याचे ते म्हणाले.
Web Title: Sanjay Raut Criticize Devendra Fadanvis In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..