esakal | सणसर-मानकरवाडी रस्त्याला २७ गतीरोधक.. | Indapur
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणेवाडी (ता.इंदापूर) येथे सणसर-मानकरवाडी ७ कि.मी रस्त्याला २७ गतीरोधक केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

इंदापूर : सणसर-मानकरवाडी रस्त्याला २७ गतीरोधक...

sakal_logo
By
राजकुमार थोरात

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सणसर-कुरवली रस्त्याचे काम सुरु आहेत. यातील सणसर ते मानकरवाडी पर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या रस्त्याने दररोज शेकडो नागरिक भवानीनगर व बारामतीकडे या रस्त्याने ये-जा करीत असतात. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ७ कि.मी. अंतरामध्ये २७ ठिकाणी गतीरोधक केले आहेत.

हेही वाचा: 'लसीकरण आपल्या दारी' कार्यक्रमाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

गतीरोधकामुळे प्रवाशांच्या दुचाकी व चारचाकी गाडी गतीरोधकावरती आदळत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. तसेच गतीरोधकामुळे नागरिकांना भविष्यात मणक्याचा,मानेचा त्रास ही होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसामध्ये भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीत

हंगाम सुरु होणार आहे. इंदापूर च्या पश्‍चिम भागातील कुरवली, मानकरवाडी, घोलपवाडी, उदमाईवाडी, उद्धट, हिंगणेवाडी परीसरातील उसाची वाहतुक या रस्त्याने बैलगाडी, ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून होणार असून गतीरोधकामुळे ट्रॅक्टर -ट्रॉली पलटी होवून अपघात होण्याची शक्यता असल्याने गतीरोधक तातडीने हटविण्याची मागणी नागरिकामधून होत आहे.

हेही वाचा: दहशतवाद्यांचे दिवस भरले, अमित शहांचा मास्टरप्लान तयार

एक कुंटूबासाठी अनेकांना त्रास...सणसर-मानकरवाडी रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या काही नागरिकांनी गतीरोधक करावे अशी मागणी केल्यामुळे गतीरोधक केले आहेत.मात्र एका कुंटूबामुळे अनेक व्यक्तिींना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत टिळेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, परीसरातील ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिल्यामुळे व नागरिकांच्या मागणीमुळे गतीरोधक केले आहेत. गतीरोधक काढण्याच्या लेखी तक्रार केल्यानंतर गतीरोधक काढण्यात येणार असून नागरिकांनी लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करावी असे सांगितले.

loading image
go to top