esakal | पुण्यात सरपंच, उपसरपंचांनी बैलगाडीव्दारे ग्रामपंचायतीत जावून स्विकारला पदभार

बोलून बातमी शोधा

पुण्यात सरपंच, उपसरपंचांनी बैलगाडीव्दारे ग्रामपंचायतीत जावून स्विकारला पदभार}

नवनिर्वाचित ग्रामपंचयात सदस्यांनी पदभार स्विकारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाताना ‘झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता पाळा, मास्क सॅनिटायझरचा वापर करा’ यासारखे समाज प्रबोधनपर फलक लावलेल्या बैलगाडीतून जात जनजागृतीबरोबरच जुनी परंपराही जपली.

पुण्यात सरपंच, उपसरपंचांनी बैलगाडीव्दारे ग्रामपंचायतीत जावून स्विकारला पदभार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरेगाव भीमा : नगर रस्त्यावरील औद्योगिक क्षेत्रात  मोठी ग्रामपंचायत असलेल्या सणसवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांनी वृक्षाराेपण, पर्यावरण संवर्धन व महिला सक्षमीकरणासह विविध सामाजिक संदेश देत व कोरोनाचे नियम पाळत बैलगाडीतून ग्रामपंचायत कार्यालयात जात पदभार स्विकारला.

आरोग्य विभागाची भरती रद्द करा, सरळसेवेचा कारभार MPSCकडे द्या; मुख्यमंत्र्यांना साकडं

राज्यस्तरीय वनराई पुरस्काराने गौरविलेल्या तसेच जिल्ह्यात औद्योगिकरणासह सामाजिक उपक्रमांमध्येही अग्रेसर असलेल्या सणसवाडी ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्यसंख्या आहे. येथील सरपंचपदी सौ. सुनंदा नवनाथ दरेकर यांची तर उपसरपंचपदी अ‍ॅड विजयराज दरेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.

सरपंच सुनंदा दरेकर व उपसरपंच विजयराज दरेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य राजुअण्णा दरेकर, दत्तात्रय हरगुडे, सागर दरेकर, अक्षय कानडे, रुपाली दरेकर, सुवर्णा दरेकर, संगीता हरगुडे, स्नेहल भुजबळ, शशिकला सातपुते आदी नवनिर्वाचित ग्रामपंचयात सदस्यांनी पदभार स्विकारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाताना ‘झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता पाळा, मास्क सॅनिटायझरचा वापर करा’ यासारखे समाज प्रबोधनपर फलक लावलेल्या बैलगाडीतून जात जनजागृतीबरोबरच जुनी परंपराही जपली. यावेळी ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवने यांनी नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंचांना पदभार दिला.

दरम्यान, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, जिल्हा नियोजनच मंडळाचे सदस्य पंडित दरेकर, माजी उपसरपंच युवराज दरेकर, बाबासाहेब दरेकर, मनसे नेते रामदास दरेकर, माजी सरपंच रमेश सातपुते, सोसायटीचे गोरख दरेकर, गोरखनाना भुजबळ आदी उपस्थित होते. 

30 टक्के हॉटेल व्यवसाय अजूनही बंदच! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्थिती

सामाजिक जनजागृती व परंपरा जपण्यासाठीच 
केला बैलगाडीतून प्रवास-
जुन्या परंपरांची जपणुक तसेच कारखानदारी असूनही वृक्षारोपण व संवर्धनामुळे राज्यस्तरीय वनराई पुरस्काराने झालेला गौरव, त्यांसाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश, तसेच सध्या काेरोनाप्रतिबंधक उपाययोजनांबाबत जानजागृती, तसेच आगामी महीलादिनाच्या पार्श्वभुमीवर बेटी बचाव व महीला सक्षमीकरणाबाबत संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठीच बैलगाडीतून गेल्याचे सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर व उपसरपंच अ‍ॅड. विजयराज दरेकर यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)