Mefedron : मेफेड्रॉनची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी देशभरातील अनेकांच्या संपर्कात

ससून रुग्णालयातील कॅन्टीनमधील कामगारामार्फत पुरविण्यात येत असलेला दोन कोटी १४ लाख रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता.
mefedron drugs
mefedron drugssakal

पुणे - उपचार सुरू असताना ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे हे मेफेड्रॉन या अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यात वास्तव्यास होते. देशभरातील अनेकांच्या ते संपर्कात होते, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने न्यायालयास दिली.

ससून रुग्णालयातील कॅन्टीनमधील कामगारामार्फत पुरविण्यात येत असलेला दोन कोटी १४ लाख रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. त्याचा पुरवठा करण्यापूर्वी भूषण आणि अभिषेक यांनी ललितचा साथीदार सुभाष मंडल याला अमली पदार्थाचा नमुना दिला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासात मिळाले आहे. त्यामुळे अंमल पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी निष्पन्न झाली आहे.

आरोपींचे मेफेड्रॉन उत्पादन, विपणन आणि विक्रीचे मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांना पथकाने मंगळवारी (ता. १०) नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. त्यांना बुधवारी (ता. ११) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या मोबार्इलमधील डेटा यांनी फॉरमॅट केला आहे. हा डेटा सायबर तज्ज्ञांकडून मिळविण्यात येत आहे. आरोपींनी अमली पदार्थांच्या विक्रीतून किती स्थावर आणि जंगम मालमत्ता जमा केली आहे याचा पोलिस तपास करीत आहेत.

दोघांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी -

मेफेड्रॉन तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेला कच्चा माल आरोपींना कोण पुरवीत होते, याचा तपास करायचा आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने देखील जप्त करायची आहेत. त्यामुळे या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

या बाबींचा होणार तपास -

- मेफेड्रॉन तयार करण्यासाठी आरोपींना कच्चा माल कोण पुरवत होते

- अमली पदार्थाच्या विक्रीतून आरोपींनी किती स्थावर व जंगम मालमत्ता जमा केली

- आरोपींचे मोठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का

- मेफेड्रॉन बनविण्यासाठी आरोपींचा आणखी कोठे कारखाना किंवा गोडाऊन आहे

- ससूनमधून आरोपींनी कोणाकोणाला मेफेड्रॉन पुरवले

- भूषण पाटील आणि विलास बलकवडे यांनी ललितचा ठावठिकाणा माहिती आहे का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com