सासवड रोड रेल्वेस्थानक बुधवारपासून नव्या जागेत: आता 'येथून' धावणार रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

नवीन स्टेशन हे पूर्वीच्या जुन्या स्टेशनपासून सुमारे दीड किलोमीटरवर आहे. काळेपडळ भागातील या नवीन रेल्वेस्थानकावर दोन फलाट असून दुतर्फा वस्ती आहे. रस्ताही उपलब्ध असल्याने प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सासवड रोड रेल्वेस्थानक नव्या जागेवर स्थलांतरित केले आहे. हे स्थानक बुधवारपासून (ता. 5 फेब्रुवारी) कार्यान्वित होणार असून नव्या स्थानकावरूनच रेल्वेगाड्यांची वाहतूक होणार आहे.

पार्कींगच्या वादातून एकास लाकडी दांडके अन् कोयत्याने मारहाण करणाऱ्यांना अटक 
 

नवीन स्टेशन हे पूर्वीच्या जुन्या स्टेशनपासून सुमारे दीड किलोमीटरवर आहे. काळेपडळ भागातील या नवीन रेल्वेस्थानकावर दोन फलाट असून दुतर्फा वस्ती आहे. रस्ताही उपलब्ध असल्याने प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सय्यदनगर, भेकराईनगर, हडपसर, मोहम्मदवाडी परिसरातील प्रवाशांना या स्थानकाचा फायदा होणार आहे. बुधवारपासून (ता. 5 फेब्रुवारी) नव्या स्थानकावरच रेल्वेगाड्या थांबतील. त्यामुळे प्रवाशांनी नवीन स्थानकावरूनच तिकिटे खरेदी करून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केले.

पुण्यात वृद्ध महिलेच्या अंगावरुन रिक्षा घालत रिक्षाचालकाने लुटले 25 हजार रुपये
 

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक
- सातारा, कोल्हापूरकडे जाणारी डेमू गाडी क्र. 71419 पुणे- कोल्हापूर, 09 वाजून 34 मिनिटे,
- डेमू गाडी क्र. 71425 पुणे- सातारा, सायं. 6 वाजून 35 मिनिटे.
- पुण्याला येणारी डेमू गाडी क्र. 71426 सातारा-पुणे सकाळी 07 वाजून 49 मिनिटे,
- डेमू गाडी क्र. 71420 कोल्हापूर - पुणे दुपारी एक वाजून 29 मिनिटे.

आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saswad Road Railway Station is Relocated at Kalepadal From Wednesday