अन्न प्रक्रीया व पूरक व्यवसायांना भविष्यात संधी- सतीश मराठे

भारतात आगामी काळात अन्न प्रक्रीया व पूरक उद्योगांना चांगला वाव आहे, शासनही प्रक्रीया व पूरक उद्योगांना प्रोत्साहन देत असल्याने भविष्यात ग्रामीण भागात उत्पादन व साठवणूक या साठी मोठी संधी असेल, असे मत सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांनी व्यक्त केले.
satish marathe
satish marathesakal

भारतात आगामी काळात अन्न प्रक्रीया व पूरक उद्योगांना चांगला वाव आहे, शासनही प्रक्रीया व पूरक उद्योगांना प्रोत्साहन देत असल्याने भविष्यात ग्रामीण भागात उत्पादन व साठवणूक या साठी मोठी संधी असेल, असे मत सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

टीजेबीएस बँकेच्या 141 व्या बारामती शाखेचे उदघाटन मराठे यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, व्यवस्थापकीय संचालिका सुब्बलक्ष्मी शिराली, संचालिका अश्विनी बापट, अनुराधा आपटे, विभागीय व्यवस्थापक दिलीप सुळे, पुण्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजीव कुमार मिश्रा, पिंपरी चिंचवडचे राकेश वाल्मिकी, ठाण्याचे विनायक गोरे, विनायक नवरे, प्रवीण पंडीत, बारामतीचे शाखाधिकारी केदार पेंढारकर, श्रीप्रसाद रिसबुड, संजय गोखले, दीपक पेशवे, अँड. विजय तावरे, सुहास भालवणकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

देशात फक्त 1430 अर्बन बँक आहेत, अजूनही देशभरात नवीन शाखा सुरु करण्यास मोठा वाव आहे, पुढील दहा वर्षे व्यावसायिक वाढीला उत्तम संधी असून या मुळे एकूणच विकासाला गती मिळणार असल्याचे सतीश मराठे म्हणाले.

पाच राज्यात बारामतीची शाखा विचारात घेता 141 शाखांचे जाळे असून 23 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बँकेकडून केला जात असल्याची माहिती अध्यक्ष शरद गांगल यांनी दिली.

satish marathe
Less Spicy Food : कमी मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

बँकेकडून 1972 पासून सलग 52 वर्षे दरवर्षी 15 टक्के लाभांश सभासदांना दिला जातो, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला 219 कोटी रुपये नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. बँकेला स्थिरत्व असून आर्थिक शिस्त पाळली जाते, असेही ते म्हणाले.

सुब्बलक्ष्मी शिराली यांनी बारामतीत उत्तम व्यावसायिक संधी असून बँक ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देईल, असे नमूद केले. या प्रसंगी बँकेचे प्रथम ग्राहक डॉ. सोमनाथ राऊत व डॉ. माधुरी राऊत यांचा सत्कार केला गेला.

satish marathe
Metro Smart Band : आता मेट्रोचं तिकीट काढण्याची गरजच नाही! प्रवाशांसाठी लाँच केलं 'स्मार्ट बँड'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com