माहेश्वरी समाजाचा ‘तीज’ सण

शिवपुराणच्या कथेनुसार पार्वतीचे पिता हिमालय, पार्वतीचे लग्न विष्णूसोबत करण्यास आग्रही होते; तर पार्वती मात्र शंकराशी लग्न करण्यास उत्सुक होती.
Maheshwari Society
Maheshwari SocietySakal

राजस्थानी समाजात विशेष करून माहेश्वरी समाजात ‘तीज’ हा सण साजरा केला जातो. बुधवारी हा सण पार पडला. त्याविषयी...

शिवपुराणच्या कथेनुसार पार्वतीचे पिता हिमालय, पार्वतीचे लग्न विष्णूसोबत करण्यास आग्रही होते; तर पार्वती मात्र शंकराशी लग्न करण्यास उत्सुक होती, नारदांच्या सल्ल्याने तिने जंगलात जाऊन स्वतःच्या केसांचा शिवलिंग बनविला आणि तपश्चर्येला सुरुवात केली. शंभर वर्षे चाललेल्या या तपश्चर्येअंती शंकराने प्रसन्न होत पार्वतीस पत्नी म्हणून स्वीकारले, तो दिवस तृतीयेचा होता आणि त्याची आठवण म्हणून राजस्थानी समाजात विशेष करून माहेश्वरी समाजात ‘तीज’ हा सण साजरा केला जातो. बुधवारी हा सण पार पडला.

श्रावण शुक्ल तृतीयेपासून सुरू होणारा हा सण कृष्ण पक्षाच्या तृतीयेपर्यंत चालतो. या १५ दिवसांत माहेश्वरी महिला आपल्या मैत्रिणींबरोबर एकमेकांच्या घरी जाऊन गीत, संगीत, पारंपरिक चिरम्यांचा खेळ, तसेच झोके खेळण्याचा आनंद घेतात.

Maheshwari Society
इसीएचएस लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन सुविधा

श्रावणात बहरलेला या निसर्गात ‘तीज’च्या आदल्या दिवशी ‘सिंजारा’ असतो. या दिवशी विवाहित स्त्रीस तिच्या माहेर तसेच सासरच्या लोकांकडून नवनवीन कपडे, अलंकार, मिठाई आदी भेटी दाखल मिळतात. सिंजाराच्या संध्याकाळी महिला घागरा ओढणीचे पोशाख, नवीन अलंकार व साज धारण करीत स्वतःचा शृंगार करते, परगावी किंवा परदेशी असणारा तिचा पती सिंजाराच्या दिवशी आवर्जून घरी येतोच.

‘तीज’च्या दिवशी उपास असतो, त्या दिवशी पाणवठ्यावर कडुलिंबाची पूजा केली जाते, संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर ‘सातूचा पिंडा’ खाऊन उपास सोडला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com