

Students Demand Optional Re-Exam for SPPU 2019 Pattern; University Clarifies Rules
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९ च्या अभ्यासक्रमामधील (पॅटर्न) उत्तीर्ण न झालेले विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ऐच्छिक फेर परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात उपोषण केले. दरम्यान विद्यापीठाच्या प्रचलित नियमांत अशा प्रकारची विशेष ऐच्छिक फेर परीक्षा घेण्याची तरतूद नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.