विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय!

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शुल्क वाढ करू नये, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

une-news" target="_blank">पुणे : 'कोरोना'मुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा नवीन शुल्क रचना केल्याने शुल्कवाढ झाली होती. मात्र, आता या शुल्कवाढीला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत अंतिम निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२३) झूमद्वारे विद्या परिषदेची बैठक झाली. विद्यापीठ प्रशासनाने शुल्क रचनेचा प्रस्ताव सादर केला असता त्यास मान्यता देण्यात आली. यामुळे अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमात ५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही महिन्यांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने ही शिफारस केली, तेव्हा यास विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. त्यावेळी ९ वर्षानंतर ही शुल्क रचना केल्याने ती अन्यायकारक नाही, असे विद्यापीठाने सांगितले होते. 

- कोथरूडकरांची काळजी वाढली; औषध व्यावसायिकाला झाली कोरोनाची लागण!

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शुल्क वाढ करू नये, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कोरोना'मुळे पालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला तरी यास एका वर्षासाठी स्थितीत दिली पाहिजे, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. त्यास विद्यापीठ प्रशासनानेही याबाबत तयारी दर्शविली आहे. त्यामुळे २०२०-२१ मध्ये जुनेच शुल्क संस्थांना आकारावे लागणार आहे. 

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका  

''विद्यापीठाने आज नवीन शुल्क रचना प्रस्ताव मंजूर केला, पण
कोरोनाच्या परस्थितीमुळे सर्वच विद्यार्थी आणि पालक अडचणीत आहेत. त्यामुळे या नवीन शुल्क रचनेची अंमलबजावणी यंदा पासून न करता पुढील वर्षापासून करावी. यंदा जुन्या पद्धतीनेच शुल्क घेतले जाईल. अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेला केली आहे. त्याबाबत बैठकीत अंतिम निर्णय होईल.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University has decided to postpone the fee hike for one year