अनुजा आणि ज्ञानदेव बोरुडे.
अनुजा आणि ज्ञानदेव बोरुडे.

Video : मुलीच्या सवाईतील सहभागाचा आनंद

Sawai Gandharva 2019 : पुणे - ‘मला वाटलंही नव्हतं, की सवाईमध्ये अनुजा पखवाज वाजवेल; पण ती तिथे पोहोचली. हे सगळं स्वप्नवत आणि कल्पनेपलीकडचं आहे. तिचा आणि माझा निर्धार पूर्णत्वास आला, याचा आज खूप आनंद होतो आहे,’’ अशी भावना ज्ञानदेव बोरुडे यांनी व्यक्त केली.

पखवाजवादक अनुजा बोरुडे यांनी आज ध्रुपद गायक जान्हवी फणसळकर आणि अमिता सिन्हा यांच्याबरोबर पखावाज वादन केले, त्याला रसिकांकडून दाद मिळाली. त्यानंतर ‘सकाळ’ने ज्ञानदेव बोरुडे यांच्याशी संवाद साधला. ते निगडीतील ज्ञानप्रबोधिनीमध्ये नोकरीस आहेत. ते म्हणाले, ‘‘पारंपरिक भजनी आणि वारकरी संगीतासाठी मी हार्मोनियमवर साथ करीत होतो. अनुजाने पखवाज शिकावा, अशी इच्छा होती. कारण ते आद्य वाद्य आहे. तिला शिकवण्यास सुरवात केली. त्या वेळी लोक म्हणायचे, की तिला वाजविता येणार नाही. कारण हे पुरुषी वाद्य आहे. पण आम्ही दोघांनी त्याचवेळी निर्धार केला की हे शिकायचेच, त्यासाठी अनुजाने खूप कष्ट घेतले. घरातून विरोध झाला म्हणून तिला बाहेरगावी ठेवून वादनाचे शिक्षण सुरू ठेवले.’’

‘‘गुंदेजा बंधूंची ओळख झाली. त्यांनी तिच्यातील कलेला प्रोत्साहन दिले. आता ती भोपाळ येथे पाच वर्षांपासून राहत असून पखवाज वादनाचे शिक्षण घेत आहे. तिने आज सवाईमध्ये वाजविले. याचा विचारही कधी केला नव्हता. तिचे आणि माझेही स्वप्न साकार झाले आहे. तिने आमच्या कुटुंबाचे नाव खूप मोठे केले आहे. आता ती परदेशी दौरेही करीत आहे. तिच्या यशाचा आलेख उंचाववत जावो, एवढीच अपेक्षा आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com