मराठी राजभाषा दिन : कवितेच्या गोडीमुळे लागली शाळेची ओढ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

आजारपणामुळे वर्षातून चार-चार महिने शाळेत न येणारी प्रज्ञा आता रोज शाळेत येऊ लागली आहे. कविता रचण्याच्या छंदामुळे ती आपले आजारपण विसरली आहे. प्रज्ञाने गेल्या सहा महिन्यांत विविध विषयांवर तब्बल ६० कविता रचल्या आहेत.

निरगुडसर - आजारपणामुळे वर्षातून चार-चार महिने शाळेत न येणारी प्रज्ञा आता रोज शाळेत येऊ लागली आहे. कविता रचण्याच्या छंदामुळे ती आपले आजारपण विसरली आहे. प्रज्ञाने गेल्या सहा महिन्यांत विविध विषयांवर तब्बल ६० कविता रचल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२७ फेब्रुवारी तारीख आली की समोर येतात ते कवी कुसुमाग्रज. कारण की हा दिवस म्हणजे त्यांचा जन्मदिवस..हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विविध विषयांवर ६० कविता लिहिणारी आंबेगाव तालुक्‍यातील रांजणी येथील प्रज्ञा दत्तात्रय वाघ ही रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. प्रज्ञाचा जन्म रांजणी येथील शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी असलेल्या प्रज्ञाला अभ्यासात चांगलीच गती होती; परंतु चौथीत असताना प्रज्ञाला संधिवाताचा त्रास होऊ लागला. हा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. 

मराठी राजभाषा दिन : मराठी माध्यमातून 'यूपीएससी'ला सामोरे जाताना...

घरातल्या सर्वांनी सर्वतोपरी डॉक्‍टर औषधोपचार केले; पण फारसा फरक पडला नाही. आजारामुळे प्रज्ञा महिने-महिने शाळा बुडवू लागली; पण वाचनाची आवड कायम होती. पाचवीत तिने नरसिंह विद्यालयात प्रवेश घेतला, पण आजारपणामुळे शाळेत येत नव्हती. 

मायबोलीला विसरणार नाही...

पाचवीत तीन महिने, सहावीत ४ महिने सातवीत चार महिने आजारपणामुळे शाळेत येऊ शकली नाही, असे जरी असले तरी प्रज्ञाची अभ्यासाची व वाचनाची आवड, ओढ कायम आहे. 

अनेक विषयांवरील पुस्तकांचे वाचन केलेले आहे. सहावी व सातवी वर्गात लाभलेले मराठी विषयाचे शिक्षिका वैशाली पिंगट व संदीप चव्हाण यांच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे विविध विषयांवर कविता करण्याची प्रेरणा मिळाली. मुख्याध्यापक डी. टी. तोडकर यांनी तिला तिच्या छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School affection caused by poetry