esakal | शाळा बंद.. पण शिक्षण सुरू.. कसे ते पहा
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ऑन लाईन सहभागी झालेले तज्ञ मार्गदर्शक.

कोव्हिड-१९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत चांगले शिक्षण पोहोचावे या उद्देशाने पुणे जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि लिडरशिप फोर इक्विटी (LFE) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या सर्व शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

शाळा बंद.. पण शिक्षण सुरू.. कसे ते पहा

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - कोव्हिड-१९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत चांगले शिक्षण पोहोचावे या उद्देशाने  पुणे जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि लिडरशिप फोर इक्विटी (LFE) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या सर्व शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील सर्व  शिक्षक हे शाळा बंद असतानाही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या स्तरावर विविध पद्धतीने काम करीत आहेत.  त्यांचे हे काम अधिक प्रभावी होऊन शाळा बंद असतानाही सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणामधील सातत्य राहण्यासाठी व मुलांचे शिकणे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शिक्षकांना सहाय्य व्हावे याउद्देशाने ऑनलाईन केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच झाली.

पुण्याचे जिल्‍हाधिकारी राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

पुणे जिल्ह्यातील एकूण ३७५ केंद्रावर ही शिक्षण परिषद ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजेश बनकर यांनी दिली.

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी या शिक्षण परिषदेपूर्वी  जिल्हा स्तरावर "सुलभकांची सुलभीकरण कार्यशाळा" घेण्यात आली होती.

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख डॉ. कमलादेवी आवटे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी उपस्थिताना  मार्गदर्शन केले. 

अखेर शाळेनं घेतलं नमतं; ब्लॉक केलेल्या 'त्या' विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सुरू!

'या प्रशिक्षणात गुगल मिटिंग कशी घ्यायची, झूम मिट मिटिंग कशी करायची, ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाची साधने आदी तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तशेच यावेळी ऑन लाईन शिक्षणात प्रयोगशील शाळांची यशस्वीता दाखविण्यात आली.'

दोन सत्रात विभागलेल्या कार्यशाळेत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाचे सर्व अधिकारी तसेच सुलभक म्हणून नितीन मेमाणे व सचिन ढोबळे यांनी कामकाज पाहिले. 

या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, तंत्रस्नेही शिक्षक व साधन व्यक्ती असे एकूण सहाशे शिक्षक ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

loading image