पुण्यातील पदवीधर तरुणांचा पुढाकार अन् मुलांचे शिक्षण झाले सुरू

पुण्यातील पदवीधर तरुणांचा पुढाकार अन् मुलांचे शिक्षण झाले सुरू

ओतूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील विद्यार्थ्यी शाळा बंद असल्याने परत शाळा सुरु झाल्यावर शाळेत येईलच याची शाश्वती फारच कमी आहे. त्यामुळे शिक्षणाची गोडी लागलेले विद्यार्थी परत शाळेकडे पाठ फिरवू नये म्हणून कोपरे (ता. जुन्नर) येथे जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापिका सुनिता निर्मळ यांच्या प्रयत्नाने ग्रामस्थांच्या संमतीने काही पदवीधर तरुणांनी येथील मुलांसाठी 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' या धर्तीवर विनामुल्य शिक्षण देणे सुरु केले आहे.

कोरोनामुळे सर्वत्र शाळा बंद आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण जेथे सुविधा आहे तेथे सुरु आहे. मात्र ज्या भागात मोबाईल नेटवर्कच नाही तेथील विद्यार्थ्यांचे काय? याविद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सुचनेनुसार जेथे नेटवर्क नाही तेथे शाळेतील शिक्षकांनी आठवड्यातून दोनदा वस्त्यावर जाऊन शिकवण्यास सुरुवात करावी अशा सूचना केल्या, त्यानुसार कोपरे परिसरात शिक्षक शिकवत होते.

मात्र कोरोना प्रसार होईल या भितीने ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घेवून वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदवीधर तरुणांनी शिक्षकांच्या सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात मुलांना शिकविण्यास पुढाकार घेवून स्वयंसेवक (शिक्षकमित्र) म्हणून विनामुल्य काम सुरु केलेे. त्यामुळे  विद्यार्थ्याना शाळेसारखेच दररोज दोन तास शिक्षण मिळू लागले.

जुन्नर तालुक्यातील कोपरे येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३३ विद्यार्थी व परिसरातील इतर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित  राहतात कि काय असी परिस्थिती निर्मण होत असताना फक्त परिसरातील जिल्हा परिषदेच्याच नाहीतर सर्वच पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तीन गटात पदवीधर तरुण स्वयसेवकांकडून शिकवणी सुरु करण्यात आली. त्यासाठी सुनील माळी यांनी स्वयंसेवकांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे १ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्याना उमेश बु. माळी, सागर मुठे, स्वाती कवटे, स्वप्निल माळी, महेंद्र माळी, अंकुश माळी, शंकर माळी हे तर ५ वी ते ७ वी तील विद्यार्थ्याना निलेश माळी, गणपत मुठे, युवराज मडके, उमेश र. माळी, विकास माळी, सागर माळी हे तसेच ८ वी ते १० वीतील विद्यार्थ्याना पूजा कवटे, रविंद्र मुठे, रामदास मुठे, पांडुरंग मुठे, किशोर माळी, रविंद्र मडके हे पदवीधर तरुण स्थानिक शिक्षकांच्या सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात मुलांना हनुमान मंदिर व बस स्थानकांंत तसेच शाळेेेच्या पडवीत मुलाना शिकवण्यास पुढाकार घेवून ऑगस्ट महिन्यापासून शिकवू लागले आहे.

दरम्यान, त्यामुळे या दुर्गम आदिवासी भागातील मुलांचेे शैक्षणिक नुकसान टळले असून, एकूण अंदाजे ६० मुले शिक्षण घेत आहे. शिकवताना कोरोनाच्या रोगाचा प्रादुर्भव होऊ नये म्हणून शासनाच्या सर्व नियम व अटीचे पालन करुन मुलांना सोशल डिस्टसिंग ठेवून शिकवले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाळा बंद झाल्याने ऑगस्ट महिन्यात या आदिवासी भागातील कोपरे जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता निर्मळ व शिक्षक शैलेंद्र देवगुणे यांनी या उपक्रमाला पदवीधर तरुण स्वयंसेवकाच्या सहकार्याने शिकवण्यास सुरुवात केली, स्वयंसेवकाना केंद्रप्रमुख एस. एस. भवारी, विस्तार अधिकारी अनिता शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्व पदवीधर तरुणांच्या कामाची दखल जुन्नर पंचायत समितीनेही घेतली आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी सुचना दिल्या मात्र जेथे नेटवर्क नाही तेथे शिक्षकांनी आठवड्यातून दोन वेेळा जाऊन शिकवावे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी स्थानिक स्वयंसेवकां मार्फत शिक्षण दिले तरी होईल. कोपरे येथे शिक्षक कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातून शिकवण्यास जात असल्याने विद्यार्थ्याच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण होत असल्यानेे पदवीधर स्वयंसेवक शिकवण्यासाठी नियुक्त केले. त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी शालेय व्यवस्थापन समिती बरोबर व स्वयंसेवकाशी चर्चा केली व सुरुवात केली. जुलैमध्ये गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी भेट देवूून कौतूक केले. तसेच गटशिक्षण अधिकारी के. बी. खोडदे यांनी सर्व स्वयंसेवकाच्या जुन्नर पंचायत समिती येथे मुलाखती ही घेतल्या आहे.-सुनिता निर्मळ, मुख्याध्यापिका

कोपरे गावात राबवण्यात आलेला शाळा बंद शिक्षण सुरु ही संकल्पना सर्व आदिवासी भागातील शाळासाठी रोल मॉडेल असून, पदवीधर तरुणांचेही आभार. या तरूणांसारखाच आदिवासी भागातूूून शिक्षण घेवून उच्च पदावर कार्यरत असलेल्या आधिकारी व आर्थिक सक्षम नागरिकांनी ही आपल्या भागाच्या विकासासाठी शासना बरोबर पुढाकार घेवून काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे आदिवासी भागात फार मोठा बद्दल घडून येईल. तसेच या भागात लवकरच मोबाईल नेटवर्क सुरु  आमदार अतुल बेनके व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या बरोबर पाठपूरावा करीत आहे. -अंकुश आमले, जिल्हा परिषद सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com