मुख्याध्यापकांनी केले 56 वर्षांचे रेकार्ड अपडेट; शाळा सोडल्याचा दाखला झाला डिझिटल

School leaving certificate Degital head master Updated 56 year Record
School leaving certificate Degital head master Updated 56 year Record

आंबेठाण : कोरोना काळात घरी असताना मिळालेल्या वेळेचा उपयोग वराळे(ता.खेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्यध्यापकाने शाळेतील रेकॉर्ड अद्ययावत करण्यात खर्ची केला आहे. मच्छिंद्र गोरक्षनाथ शेटे असे या उपक्रमशील शिक्षकाचे नाव असून शाळा सोडल्याचा देण्यात येणारा दाखला त्यांनी संगणिकृत केला असून केवळ एका क्लिक वर हा दाखला आता आजी-माजी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. शाळा स्थापनेपासून म्हणजे १९६५ सालापासून असणारे रेकॉर्ड यामुळे अद्ययावत झाले आहे.

लॉकडाऊन काळात ऑनलाइन शिक्षण सुरू होते त्यामुळे बराचसा वेळ मिळत असल्याने रेकॉर्ड अद्ययावत करण्याचा संकल्प शेटे यांनी केला होता.डिजिटल यंत्रणेचा त्यांनी योग्य पद्धतीने उपयोग केल्यामुळे आता काही क्षणात शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होणार  आहे. काळानुसार रजिस्टर खराब झाले, हरवले, भिजले या सबबी आता ऐकायला मिळणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे बोनाफाइड देखील यामुळे एका क्लिकवर मिळणार असल्याने लिखापडीचा वेळ वाचणार आहे.

हेही वाचा - शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ

वराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आला असून संगणकावर जनरल रजिस्टर नंबर एन्ट्री केल्यास विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रिंट मिळते.शाळेतील दोन रजिस्टर मिळून जवळपास ११०० च्या वर दाखले त्यांनी डिझिटल केले आहेत.

हेही वाचा - शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ
शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे यांनी कोरोना संकट काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग करून शाळेमध्ये आत्ता पर्यंत शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा डाटा एन्ट्री केल्यामुळे हे शक्य झाले आहे.संगणकामध्ये डाटा एंट्री झाल्याने जरी रेकॉर्ड पुन्हा पुनर्लेखन करण्याची वेळ आली तरी यामुळे ते काम आता शक्य होणार आहे. या डिजिटल दाखल्याचा शुभारंभ नुकताच जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टेपाटील,पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर,गटशिक्षणाधिकारी  संजय नाईकडे यांच्यासह मतदारसंघातील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शाळा प्रमुख उपस्थित होते. याकामी शाळेतील अन्य सहकाऱ्यांनी मदत केल्याचे शेटे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com