शाळा सुरू होणार; पण विद्यार्थ्यांना करावी लागणार उजळणी

कोरोनाच्या सावटामुळे गेल्यावर्षी शाळा ऑनलाइनद्वारेच भरविल्या गेल्या. इयत्ता नववी, दहावी आणि बारावी, त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग काही दिवस प्रत्यक्ष सुरू झाले होते.
Student Review
Student ReviewSakal

पुणे - कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव यंदाही शाळा (School) ऑनलाइनद्वारेच (Online) सुरू होणार आहेत. परंतु शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी (Student) पुढील वर्गात जाणार असले, तरीही त्यांना सुरवातीची काही दिवस मागील वर्गाच्या अभ्यासाची उजळणी (Review) करावी लागणार आहे. त्यासाठीच्या ‘ब्रीज कोर्स’चे नियोजन आणि आखणी सध्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सुरू आहे. लवकरच हा ‘ब्रीज कोर्स’चा आराखडा राज्यातील सर्व शाळापर्यंत पोचविला जाणार आहे. (School Start Student Last Year Syllabus Review)

कोरोनाच्या सावटामुळे गेल्यावर्षी शाळा ऑनलाइनद्वारेच भरविल्या गेल्या. इयत्ता नववी, दहावी आणि बारावी, त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग काही दिवस प्रत्यक्ष सुरू झाले होते. हे वगळता संपूर्ण शैक्षणिक वर्षात व्हिडिओ कॉल, यु-ट्युब, व्हॉटस्‌ॲप, गुगल क्लासरूम, दुरदर्शन अशा माध्यमांचा वापर करून ऑनलाइनद्वारेच विद्यार्थ्यांना शिकविले गेले. यंदाही १४ जूनपासून शाळा सुरू होणार असल्या तरी, त्या ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होतील. परंतु शाळा सुरू झाल्यानंतर आधीच्या वर्गातील महत्त्वाच्या अभ्यासक्रमाची पुन्हा उजळणी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी परिषदेमार्फत ‘ब्रीज कोर्स’ची आखणी होत असल्याचे परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.

Student Review
मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही - प्रकाश आंबेडकर

शिक्षणासाठी ‘दुरदर्शन’वरील तासिका वाढणार

गेल्यावर्षी दूरदर्शनवर अभ्यासक्रमांवर आधारित मालिका सुरू केल्या होत्या. यात प्रामुख्याने दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित मालिका होत्या. परंतु यंदा अन्य इयत्ताचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मालिका असणार आहेत. तसेच गेल्यावर्षी ‘दुरदर्शन’वर शैक्षणिक मालिकांसाठी साधारणत: दोन तासाचा कालावधी मिळाला होता. यंदा किमान पाच तासांचा कालावधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूरदर्शनवरील शैक्षणिक मालिकांमुळे इंटरनेटची सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंतही पोचणे शक्य होणार आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये, म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत.

असा असेल ‘ब्रीज कोर्स’

- पुढील वर्गात (इयत्तेत) गेल्यानंतरही आधीच्या इयत्तेतील अभ्यासक्रमाची उजळणी करावी लागेल.

- आधीच्या इयत्तेतील कोणता अभ्यासक्रम शिकविणे आवश्यक आहे, याचे नियोजन सुरू

- शाळा सुरू झाल्यावर सुरवातीच्या काही दिवसांत हा अभ्यासक्रम शिकविला जाईल आणि मग नियमित इयत्तेचा अभ्यासक्रम शिकविला जाईल.

- शिक्षकांनी मागील अभ्यासक्रमाची उजळणी कशी करावी, कोणत्या पाठांची उजळणी प्रामुख्याने घ्यावे, याबाबत मार्गदशन असेल

Student Review
"नव्या युद्धनीतीनुसार तिन्ही दलांना समन्वयाने कार्य करण्याची गरज"

पालकांनी काय करावे :

- पुढील इयत्तेत जाण्यापूर्वी आधीच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांवरून मुलांची घरच्या घरी उजळणी करून घ्या.

- वर्षभर मुले शाळेपासून दूर आहेत, अशात ऑनलाइन शिक्षणाद्वारे मुलांना अभ्यासक्रम कितपत कळलाय, याची चाचपणी तुम्ही देखील तुमच्यापरीने करून घ्या.

- काही अभ्यासक्रम समजला नसेल, तर तुम्ही तो समजावून सांगा, किंवा त्यासाठी शिक्षकांची मदत घ्या.

- आधीच्या इयत्तेतील अभ्यासक्रमाबाबत मुलांशी संवाद साधा, म्हणजे अभ्यासक्रम कितपत कळलाय याचा अंदाज येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com