शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन परीक्षेचा सराव करता येणार फ्रीमध्ये!

Students_Online_Exam
Students_Online_Exam

पुणे : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे पहिल्या सत्रातील मूल्यमापन दिवाळीपूर्वी करण्यासाठी अनेक शाळांनी पावले उचलली आहेत. यात तोंडी परीक्षबरोबरच बहुपर्यायी परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्याची तयारी सुरू झाली आहे. परंतु लाखो विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनतर्फे ‘टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट’ अर्थात ‘टॉप टेस्ट’ ही सराव सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा अद्याप बंद आहेत. परंतु शाळांनी राबविलेल्या ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे पहिल्या सत्राचे शालेय शिक्षण पूर्ण करण्याचे प्रयत्न होत आहे. आता शाळांतर्फे सत्रात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

अनेक शाळांमध्ये या सत्रात तोंडी परीक्षांपाठोपाठ बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरुपातील सत्रांत लेखी परीक्षाही घरातून देण्याची ऑनलाईन सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी घरचा संगणक किंवा स्मार्टफोन वापरणे अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्मार्टफोनवरील अशा ऑनलाईन परीक्षा सोडविण्याचा पूर्वानुभव नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक परीक्षेतील गुणांविषयी आणि यशाविषयी चिंतेत आहेत. या शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी tilimili.mkclkf.org या संकेतस्थळावर एमकेसीएलच्या सहकार्याने विनामूल्य ‘टॉप टेस्ट' उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे पाठातील आशय आणि संकल्पनांचे ज्ञान,आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णयक्षमता यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी दिली.

‘टॉप टेस्ट'चा कालावधी : इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी 

माध्यम कालावधी
मराठी माध्यम २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर
सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यम २३ ऑक्टोबर ते  २ नोव्हेंबर

अशी होईल सराव परीक्षा :
- प्रत्येक इयत्तेसाठी असेल विषयनिहाय परीक्षा
- प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित ३० प्रश्न असतील.
- एका परीक्षेचा कालावधी ३० मिनिटे असेल.
- विद्यार्थ्यांना दहा-अकरा दिवस दररोज अनेक विषयांच्या अनेक परीक्षांचा सराव करणे होणार शक्य

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com