पुणे : विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनला आग; अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेनवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

विद्यार्थ्यांना सोडून चालक स्कूल व्हॅन संध्याकाळी घरी घेऊन जात असताना इंजिनमधून अचानक धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चालक विश्‍वनाथ गालाडे यांनी व्हॅन थांबवून अग्निशामक दलाला माहिती दिली. त्या वेळी सीएनजी गॅस बाहेर पडून आग भडकली होती.  

कात्रज(पुणे) : विद्यार्थ्यांना सोडून वडगाव उड्डाण पुलाच्या दिशेने निघालेल्या स्कूल व्हॅनला लागलेली आग शमविण्यात कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती व्हॅनचालकाने दिली. 

धक्कादायक! राहत्या घरात आढळला मुलीचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

विद्यार्थ्यांना सोडून चालक स्कूल व्हॅन संध्याकाळी घरी घेऊन जात असताना इंजिनमधून अचानक धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चालक विश्‍वनाथ गालाडे यांनी व्हॅन थांबवून अग्निशामक दलाला माहिती दिली. त्या वेळी सीएनजी गॅस बाहेर पडून आग भडकली होती.

#PmcIssue ताडपत्रीखाली काय लपविले आहे सुतार दवाखान्यात

घटनास्थळी आलेले कात्रज अग्निशामक केंद्राचे प्रमुख संजय रामटेके, शाबीर शेख, रूपेश जांभळे, वसंत भिलारे, किरण पाटील, तेजस माडवकर, सागर इंगळे, धीरज जगताप, शुभम शिर्के यांनी ही आग अटोक्यात आणली.

मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Van caught fire in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: