शाळा होणार लवकरच सुरू पण, शिक्षकांसाठी महत्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

शाळा 23 नोव्हेंबरला सुरू होणार असल्याने कोरोनाची आर्टिपीसीआर टेस्ट शिक्षकांना शासनाने बंधनकारक केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बनकर शाळा येथील  केंद्रावर शिक्षकांची टेस्ट करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ही टेस्ट केली असेल तरच 23 नोव्हेंबरला शिक्षकांना शाळेत हजर करून घेण्यात येणार आहे. मात्र या केंद्रावर रोज केवळ 195 जणांची टेस्ट केली जात आहे.

हडपसर - शाळा 23 नोव्हेंबरला सुरू होणार असल्याने कोरोनाची आर्टिपीसीआर टेस्ट शिक्षकांना शासनाने बंधनकारक केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बनकर शाळा येथील केंद्रावर शिक्षकांची टेस्ट करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ही टेस्ट केली असेल तरच 23 नोव्हेंबरला शिक्षकांना शाळेत हजर करून घेण्यात येणार आहे. मात्र या केंद्रावर रोज केवळ 195 जणांची टेस्ट केली जात आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना टेष्ट न करता परत घरी जावे लागत आहे. या केंद्राची टेस्टिंग क्षमता वाढवावी अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक तुकाराम डोंगरे म्हणाले, शेकडो शिक्षक टेस्टसाठी हडपसर येथी केंद्रावर येत आहेत. केंद्रावरील यंत्रणा तोकडी आहे, त्यामुळे अनेकांना घरी परत जावे लागत आहे. केवळ 195 जणांची टेस्ट केली जात असल्याने शेकडो शिक्षकांची 23 नोव्हेंबरपर्यंत टेस्टिंग होऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांना शाळेत हजर करून घेतले जाणार नाही, त्यामुळे टेस्टिंगची क्षमता वाढविण्याची गरज आहे.

मुद्रांक शुल्कात दिलेल्या भरीव सवलतीमुळे घरांच्या खरेदीत वाढ

याबाबत क्षेत्रीय वैदिकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे म्हणाल्या, शासनाकडून शिक्षकांची आर्टिपीसीआर टेस्ट करण्याबाबत कोणताही आदेश आम्हाला मिळालेला नाही, सर्वांची आर्टिपीसीआर टेस्ट करण्याची मागणी आहे त्यामुळे आम्ही रोज 195 टेस्ट करत आहोत. रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याची सुविधा आहे. मात्र, आर्टिपीसीआर टेस्टचीच मागणी आहे. शासनाने आधीच आदेश दिला असता तर टेस्टिंग सुविधा वाढवण्यात आल्या असत्या.

पुणे पदवीधरसाठी महविकासआघाडी सरसावली तर मनसेचा मेळावा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School will start soon but important news for teachers