esakal | पुणे पदवीधरसाठी महविकासआघाडी सरसावली तर मनसेचा मेळावा
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे पदवीधरसाठी महविकासआघाडी सरसावली तर मनसेचा मेळावा

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

पुणे पदवीधरसाठी महविकासआघाडी सरसावली तर मनसेचा मेळावा

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची  निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतशी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुण्यात लवकरच सुरु होत आहे वैद्यकीय महाविद्यालय

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेचा राजकीय मेळावा होण्याची शक्यता आहे. तसेच आज महाविकासआघाडीच्या उमेदवारासाठी पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कालच भाजपचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडीवर हल्ला चढविला होता. 

आता पदवीधरसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मैदानात उतरल्याचे दिसून येत आहेत. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख हे दोघेही उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. तसेच रूपाली पाटील या पुण्यातील आहेत. श्रीमंत शिवाजी कोकाटे हे देखील उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत बहुरंगी होण्याचीच शक्यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामध्ये सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

२००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील

आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकाआघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील, शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे, मंत्री विश्वजित कदम, मंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे रमेश कोंढे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. आता मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं राजकीय हालचालींना वेग आल्याचेच दिसून येत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार) 


 

loading image
go to top