मुद्रांक शुल्कात दिलेल्या भरीव सवलतीमुळे घरांच्या खरेदीत वाढ

मुद्रांक शुल्कात दिलेल्या भरीव सवलतीमुळे घरांच्या खरेदीत वाढ

पुणे - महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात डिसेंबरअखेरपर्यंत दिलेल्या भरीव सवलतीमुळे त्याचा बांधकाम व्यवसायावर राज्यभर चांगला परिणाम झालेला दिसून येत आहे. कोरोना कालावधीमध्ये घरनोंदणी प्रक्रियेमध्ये बरीच घट झालेली होती. त्यामध्ये सुधारणा होऊन मागील वर्षीच्या सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामधील खरेदी व्यवहारापेक्षा या वर्षी या तीन महिन्यांत ३६ टक्के खरेदी व्यवहारांची नोंदणी जास्त झाली आहे, अशी माहिती ‘क्रेडाई’चे राज्‍याचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोंदणी निरीक्षकांच्या अहवालावरून मागील वर्षी सप्टेंबरमध्ये १ लाख ९० हजार दस्तऐवज नोंदणी झाले होते. त्यामध्ये वाढ होऊन २ लाख ७३ हजार इतकी दस्तनोंदणी झालेली दिसून आली आहे. फक्त नोव्हेंबर महिन्यातील १३ दिवसांमध्ये १ लाख २१ हजार दस्तांची राज्यभर नोंदणी झालेली आहे.

मुद्रांक शुल्कातील कपातीमुळे ग्राहकांनी घरखरेदीमध्ये गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय निवडलेला दिसून येत आहे. राज्यभर काही बांधकाम व्यावसायिकांनी उत्सव कालावधीमध्ये ग्राहकांसाठी विशिष्ट सवलती जाहीर केल्यामुळे तसेच कोरोनाच्या काळात घर खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे या खरेदीमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे, असे पारीख यांनी म्हटले आहे. यामुळे यंदाची दिवाळी राज्यभरातील जवळपास तीन हजार क्रेडाईच्या बांधकाम व्यावसायिक सभासदांसाठी एक चांगली पर्वणी ठरली आहे.

बांधकाम व्यवसायात जीएसटीमधली करकपात, मुद्रांक शुल्कामधील सवलती तसेच गृहकर्जाच्या व्याजदरात झालेली मोठी घट, यामुळे घर घेणाऱ्यांना अत्यंत पोषक असे वातावरण दिसून येत आहे. उत्सुक ग्राहकांना घरखरेदीसाठी आत्ताच मोलाची संधी असून, डिसेंबरअखेर असलेल्या या सवलतीचा फायदा घ्यावा.
- राजीव पारीख

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com