पुणेकरांनी सूर्यालाही हात घातला; संशोधनात उचलला मोलाचा वाटा!

Scientists of pune discover an explosion that illuminates the sun
Scientists of pune discover an explosion that illuminates the sun
Updated on

पुणे : पृष्ठभागापेक्षाही तब्बल 300 पटींनी अधिक उष्ण असलेल्या सूर्याच्या वायुमंडळाबद्दल (करोना) शास्त्रज्ञांना अजूनही कुतूहल आहे. सूर्याचे प्रभामंडळ देदीप्यमान करणारी ही ऊर्जा चुंबकीय क्षेत्रातून येत असावी हे माहीत होते, परंतु हे घडते कसे याबद्दल शास्त्रज्ञांना अजूनही कल्पना नाही. पृष्ठभागातून चुंबकीय ऊर्जा कार्यक्षमपणे बाहेर पडण्याचे ठिकाण म्हणजे, त्यावरील असंख्य सूक्ष्म विस्फोट! असाच एक सूक्ष्म विस्फोट टिपण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे.
 पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दीर्घकाळ प्रतीक्षा असणारा हा सुक्ष्मविस्फोट राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी शोधला आहे. पश्‍चिम ऑस्ट्रलिया स्थित कमी वारंवारितेची दुर्बीण "मार्चिसन वाईडफिल्ड अरे' आणि "एनसीआरए'च्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहे. एनसीआरएचे प्रा.दिव्य ओबेरॉय, संशोधक विद्यार्थी सुरजित मोंडल आणि संस्थेतील माजी संशोधक विद्यार्थी डॉ. अतुल मोहन यांनी हे संशोधन पूर्ण केले आहे. अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची शोधपत्रिका "ऍस्ट्रोफिजीकल जर्नल लेटर्स'मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. 

आणखी वाचा - वाचा चक्रीवादळ आणि पुण्यातल्या उपाययोजना 

संशोधनाची पार्श्‍वभूमी ः 
- सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 5 हजार 500, तर वायुमंडळाचे तापमान 20 लाख अंश सेल्सिअस 
- असंख्य सुक्ष्मस्फोटांचा एकत्रित शोध घेतला जायचा, पण वैयक्तिकरीत्या त्यांना शोधले गेले नव्हते 
- सूर्याच्या पृष्ठभागावर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना चुंबकीय क्षेत्र हजार पटींनी बदलते 
- चुंबकीय क्षेत्र बदलत असताना वायुमंडळाचे तापमान सारखेच का? हा मोठा प्रश्‍न 
- चुंबकीय ऊर्जा वायुमंडळात कशी साठविले जाते याबद्दल अजूनही प्रश्‍नचिन्ह 


आणखी वाचा - पुण्यातून प्रवास करणार असला तर ही बातमी वाचा

असे झाले संशोधन 
- वैयक्तिकरीत्या कमकुवत असलेले हे स्फोट एकत्र येऊन वायुमंडळाला तापवितात 
- स्फोटांतून उत्सर्जित क्ष किरणे आणि अतिनील किरणांना टिपण्यात आजवर अपयश 
- कमी ताकदीच्या या स्फोटांना उपलब्ध उत्तम उपकरणांनाही टिपणे शक्‍य झाले नाही. 
- हे स्फोट सूक्ष्म रेडिओ प्रकाशझोत उत्सर्जित करण्याची दाट शक्‍यता शास्त्रज्ञांना होती 
- 2013 पासून भारतीय शास्त्रज्ञांनी रेडिओ लहरींचे निरीक्षणे घेतली 
- त्यासाठी एनसीआरए मध्ये संवेदनशील सौर रेडिओ प्रतिमा मिळविण्याचे तंत्र विकसित करण्यात आले. 

आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

आम्ही शोधून काढलेले अत्यंत कमकुवत रेडिओ झोत हे आजवर सूर्याच्या पृष्ठभागावर निदर्शनास आलेल्या दुर्बल स्फोटांपेक्षाही शंभर पटीने कमकुवत आहे. या सूक्ष्म चुंबकीय स्फोटांमध्येच सूर्याचे वायुमंडळ तप्त करण्यासाठी पुरेशी ऊर्जा असावी. संशोधनासाठी बराच वेळ लागला तरी, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे विज्ञानात प्रगती कशी होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. 
- प्रा. दिव्य ओबेरॉय, एनसीआरए 

पुरंदरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com