सायटेक स्पर्धेत सिंबायोसिसची बाजी

नेहरु मेमोरिअल हॉल - ‘सायटेक ज्युनियर क्वीझ कॉम्पिटिशन’मधील विजेते संघ आणि मान्यवर.
नेहरु मेमोरिअल हॉल - ‘सायटेक ज्युनियर क्वीझ कॉम्पिटिशन’मधील विजेते संघ आणि मान्यवर.

पुणे - मुक्तांगण विज्ञानशोधिका व लीप अँड स्केल यांच्यातर्फे आयोजित ‘सायटेक ज्युनियर’ या क्वीझ कॉम्पिटिशनमध्ये सिंबायोसिस प्रशालेच्या अनिश बक्षी, अथर्व बर्वे व अमेय भोसेकर यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय क्रमांक सेंट मेरीज स्कूलच्या कर्ण नायक, वरद कर्णावत व आर्यमान मलिक यांना मिळाला. दोन्ही संघांना लीप अँड स्केलची एक आठवड्याची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.

वेगवेगळ्या शाळांमधील उत्साहपूर्ण विद्यार्थी, पालक शिक्षक, वेगवेगळ्या प्रश्नांना चुरशीने सामोरे जाणारे संघ आणि उत्तरोत्तर रंगत गेलेली स्पर्धा हे चित्र नुकतेच नेहरू मेमोरिअल सभागृहात पाहायला मिळाले. निमित्त होते, ‘सायटेक ज्युनियर’ स्पर्धेचे.    
या स्पर्धेला पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांनी भरघोस प्रतिसाद दिला. सातवी, आठवी व नववीतील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन विद्यार्थ्यांचा एक संघ होता. १०४ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. सिंबायोसिस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक मिळविला. त्यांना २५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. सेंट मेरीजला द्वितीय क्रमांकासाठी १८ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

लिप अँड स्केलचे संचालक प्रशांत जोशी या स्पर्धेचे परीक्षक होते. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील विद्यार्थ्यांचा कस पाहणाऱ्या प्रश्नांचा समावेश यात होता. अंतिम फेरीपर्यंत पोचलेल्या संस्कृती स्कूल, शामराव कलमाडी स्कूल, ब्लू रिज पब्लिक स्कूल, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल या शाळांच्या संघांना मुक्तांगण विज्ञानशोधिकेच्या इनोवेशन फौंडेशन कोर्स, समर सायन्स वर्कशॉपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. 

अध्यक्षस्थानी पुणे लिटररी फेस्टिव्हलच्या संचालिका डॉ. मंजिरी प्रभू होत्या. मुक्तांगण विज्ञानशोधिकेचे संचालक अनंत भिडे या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com