esakal | ... तर राज्यातील मूर्तीकारांचे चारशे कोटींचे नुकसान होईल!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav_Sculptors

पुणे जिल्ह्यात गणपती बनविणारे एकूण 1800 कुंभार कारागीर असून त्यातील 200 कारागीर हे 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बनवितात.

... तर राज्यातील मूर्तीकारांचे चारशे कोटींचे नुकसान होईल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीची उंची चार फूटापर्यंतच ठेवण्याच्या निर्णयाचा फटका मूर्तिकारांना बसू शकतो, या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी मूर्तीकारांच्या वतीने होत आहे. 

मूर्तीकारांनी या सर्व प्रकारात जवळपास चारशे कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. या एकाच निर्णयामुळे मूर्तीकरांचे आर्थिक गणित कोलमडून जाईल  त्या मुळे शासनाकडून या बाबत आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी होत आहे. 

- हलका, मध्यम की मुसळधार पाऊस होणार? हवामान खात्याने काय वर्तवलाय अंदाज?

कोरोनामुळे यंदा राज्य शासनाने चार फूटांहून अधिक मूर्तीला परवानगी न देण्याचा निर्णय झाला आहे. या मुळे तयार केलेल्या मूर्तींचे काय करायचे हा प्रश्न मूर्तीकारांपुढे आहे. यात मूर्तीकारांचे राज्यात चारशे कोटींचे नुकसान होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

दरम्यान या संदर्भात राज्यभरातील मूर्तीकारांकडून शासनाला निवेदन देण्याची आता तयारी सुरु झाली आहे. माती कला विकास सेलचे राष्ट्रीय अध्यध दत्ता कुंभार यांनी या संदर्भात माहिती दिली. राज्यातील कुंभार बांधव हे तहसिलदार, जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही या बाबतचे निवेदन देणार आहेत. 

- जेईई, नीट परीक्षा पुढे ढकला; का होतीय अशी मागणी?

पुणे शहर, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, भोर, मावळ, मुळशी, दौंड आणि हवेली या भागात मोठे गणपती बनविणारे कुंभार कारागीर आहेत. पुणे जिल्ह्यात गणपती बनविणारे एकूण 1800 कुंभार कारागीर असून त्यातील 200 कारागीर हे 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बनवितात.

राज्याचा विचार केला तर सगळ्या जिल्ह्यात गणपती मूर्ती बनवितात, परंतु कोल्हापूर, अलिबाग, पेण, सातारा, ठाणे, बीड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर वर्षभर गणपती बनविण्याचा व्यवसाय चालतो.

- धक्कादायक! पुण्यात सुरू असलेल्या प्रकारामुळं कोरोनाला मिळतंय आमंत्रण; काय आहे हे प्रकरण?

चारशे कोटींचे नुकसान होण्याची भीती...
आज राज्याचा विचार करता मूर्तीकारांकडे गणेश मंडळाच्या ऑर्डरप्रमाणे 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या 70 हजार मूर्ती बनवून तयार करून ठेवल्या आहेत. फक्त रंगकाम बाकी आहे. ह्या मूर्तींची किंमत अंदाजे 400 कोटींपेक्षाही जास्त होईल.
- दत्ता कुंभार, माती कला विकास सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image