
देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अंदाजानुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या लाटेचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. याउलट पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तावली आहे. या यंत्रणेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी काहीच देणेघेणे दिसत नाही.
पुणे - देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अंदाजानुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या लाटेचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. याउलट पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तावली आहे. या यंत्रणेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी काहीच देणेघेणे दिसत नाही. कोरोना वाढण्याचा धोका असताना आरोग्य यंत्रणा इतकी थंड का? असा सवाल सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी गुरुवारी (ता.3) जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत बोलताना केला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा इतकी थंड असेल तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखणार कसे, असा प्रश्नही या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने गाफील न राहता, पूर्ण ताकदीनिशी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी यावेळी केली. या मुद्यावर सदस्यांनी जिल्हा आरोग्य संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पुणे : गुटखा हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 3.5 कोटींची रोकड अन् 9 जण पोलिसांच्या ताब्यात
ग्रामीण भागातील कोरोना स्थितीचा मुद्दा शरद बुट्टे पाटील यांनी उपस्थित केला. त्यांच्या या मागणीला आशा बुचके, वीरधवल जगदाळे आदी सदस्यांनी पाठिंबा देत, आरोग्य यंत्रणा सतर्क करण्याची मागणी केली. एकीकडे प्रशासनच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सांगत असून, दुसरीकडे कोविड केअर सेंटर्स बंद केले जात आहेत. चाचण्यांचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. प्रतिबंध क्षेत्राबाबत नागरिकांना कुठलीच माहिती नसते. कोरोना चाचणी केल्यास त्याचे अहवाल वेळेवर मिळत नाही. आरोग्य केंद्रात रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचे बुट्टे पाटील आणि जगदाळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला; मित्राच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केला बलात्कार
आयुष्यमान'ची कामे निकृष्ट - बुट्टे पाटील
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची आयुष्यमान भारत योजनेंतर्गत करण्यात आलेली कामे निकृष्ट झाली आहेत. तरीही या कामांची देयके अदा केली जात असल्याचा मुद्दा शरद बुट्टे पाटील यांनी उपस्थित केला. देयके अदा करण्यापूर्वी या कामांचा दर्जा तपासावा आणि तोपर्यंत देयके देऊ नयेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. या योजनेंतर्गत जिल्ह्याला 29 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी आतापर्यंत आठ कोटी रुपयांचे देयके अदा करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil