माध्यमिक शाळांमध्येही बोगस शिक्षण भरती 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

दाभाडे हा नवनगर शिक्षण मंडळ संचालित शाळेचा संस्थापक अध्यक्ष आहे. चिखलीतील संत तुमाराक महाराज माध्यमिक विद्यालय या शाळेत सहा शिक्षकांना व्यक्तींना दाभाडे याने मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे - शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी गोविंद दाभाडे याने त्याच्या आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळेत बनावट व्यक्तींना शिक्षक-शिपाई यांना अनुदानित पदावर भरती केले आहे. प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळेतही या प्रकरणातील आरोपींनी अनुदानित पदावर बोगस शिक्षक भरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दाभाडेच्या पोलिस कोठडीत दोन फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. 

भाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक...

पोलिस तपासात प्रगती असून शिक्षकांची माध्यमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या मदतीने बेकायदेशीररीत्या नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक शाळात आणि शैक्षणिक संस्थेत शिक्षकांची भरती मागील काही दिवसांत करण्यात आली. शिक्षक घोटाळ्यातील मुख्य आरोपी संभाजी शिरसाठ याच्या बॅंक खात्यावर शिक्षकांनी मोठ्या रक्कम जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शिक्षकांना नियुक्तीची बनावट कागदपत्रे देण्यात आली असून या व्यक्तींची मान्यता पुणे जिल्हा परिषदेच्या जावक-आवक रजिस्टरमध्ये दिसलेली नाही. संबंधितांना मान्यता देत आरोपींनी शिक्षकांसोबतच शिपाई पदावरील भरती ही अनधिकृतपणे केली आहे, असे याबाबतच्या आदेशात नमूद आहे. 

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार

दाभाडे हा नवनगर शिक्षण मंडळ संचालित शाळेचा संस्थापक अध्यक्ष आहे. चिखलीतील संत तुमाराक महाराज माध्यमिक विद्यालय या शाळेत सहा शिक्षकांना व्यक्तींना दाभाडे याने मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. आणखी काही प्राथमिक व माध्यमिक शाळांत याच प्रकारे बनावट शिक्षक भरती केल्याची दाभाडे याने पोलिसांना सांगितले आहे. त्यासंदर्भात तपास सुरु असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांचे पथक करीत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Secondary schools Teacher recruitment scam pune