पीएमपीच्या बसखाली चिरडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना

पीएमपीच्या बसखाली चिरडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना

सिंहगडरस्ता(पुणे) : सिंहगडरस्त्याला पीएमपीएल बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (ता. २९) सकाळी घडली. जयंत रामजी महाडीक (वय67) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अधिक वाचा-  उर्मिला मातोंडकर मुळच्या शिवसैनिकच, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट- नऱ्हे (पीएमपीएल बस क्रमांक एम एच १२ एफओ २४४०) ही बस आनंदनगरहून माणिकबागेच्या दिशेने निघाली होती. दुचाकीवर जयंत रामजी महाडीक (वय ६७ वर्षे रा. नांदेड गाव) हे घरी निघाले होते. महाडीक हे सुरक्षारक्षकम्हणून नवश्या मारुती परिसरातील सोसायटीत नोकरीस होते.

रात्रपाळीचे काम संपवून सकाळी आठ साडेआठच्या सुमारास ते घरी निघाले होते. आनंदनगर चौकातून बस पुढे निघाली होती. मागच्या बाजूस महाडीक दुचाकीवरून येत होते. दरम्यान त्यांना धक्का लागलाआणि ते बसच्या मागच्या चाकाखाली सापडले. याल त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळ मृतदेह जागीच पडून होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाडीक हे कोकणातील कुर्ले दिवेकरवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथील मुळचे रहिवासी होते. रक्षक सिक्यूरिटी या संस्थेते ते कामास होते. त्याअंतर्गत नवशा मारुती परिसरातील एका सोसायटीत ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. महाडिक कोकणात पूर्वी शेती आणि संबंधित पूरक व्यवसाय करीत होते. त्यांना दोन मुले आणि तीन मुली  आहेत. त्यांच्या पत्नीचे पूर्वीच निधन झाले आहे.

तो चहा ठरला शेवटचा
सकाळी सात सव्वा सातच्या सुमारास महाडीक यांची कामाची वेळ संपली त्यानंतर माझी जबाबदारी होती. सकाळी आल्यानंतर आम्ही दोघांनी चहा घेतला आणि तो चहा आमचाशेवटचा चहा ठरला. महाडिक उत्तम सहकारी होते. चहा आणि मासे हे त्यांचे आवडते पदार्थ, कामात त्यांचे सहकार्य उत्तम होते. सहकाऱ्यांना समजून घेत होते. परंतु आज सोबतघेतलेला चहा शेवटचा ठरला आणि मनावर मोठा आघात झाला.
- मारुती चव्हाण (सुरक्षारक्षक)

 Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​


हेल्मेट नसल्याने अपघात
महाडीक यांचा जागीच मृत्यू झाला मात्र हेल्मेट नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. हेल्मेट असते तर कदाचित हे चित्र वेगळे असते अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त
करीत होते.

''यापूर्वीही असे अपघात झाले आहे. नागरिकांमधे हेल्मेट बाबत जनजागृती व्हावी म्हणून अनेक उपक्रम आम्ही संस्थेच्या माध्यमातून गेली चार राबवित आहोत. नागरिकांनी हेल्मेटसक्ती न समजता गरज आणि सुरक्षा म्हणून हेल्मेटकडे बघणे गरजेचे आहे.''
-धनंजय मुळे (उपाध्यक्ष, रिझन ट्रॅफिक फाउंडेशन)

 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com