सुरक्षारक्षक काकांनी दाखविली `अशी` मनाची श्रीमंती

महादेव पवार
Friday, 5 June 2020

दीड लाखाचे सापडलेले सोने केले परत

वारजे (पुणे) : सोन्याचे भाव गगनाला भिडत असल्याने सोन्याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, तरीसुद्धा एका सुरक्षारक्षक काकांनी कोणताही लोभ न धरता रस्त्यावर पडलेले दीड लाखाचे सोने संबंधित व्यक्तीला परत केले. त्यांच्या या प्रामाणिक पणाचे वारज्यात कौतुक केले जात आहे. वारजे येथील कुलकर्णी  रुग्णालयामध्ये महाराष्ट्र फ्रंटलाईन सिक्युरिटी अँड सर्व्हिसेसद्वारे जगन्नाथ पेवेकर सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत. कामावर हजर असताना या रुग्णालयासमोर तीन ते साडे तीन तोळे सोन्याची माळ (अंदाजे किंमत दीड लाख )  त्यांना दिसून आली. त्यांनी ती सोन्याची माळ त्यांनी रुग्णालयाचे मालक श्रीरंग कुलकर्णी यांच्याकडे दिली.

अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

वयस्कर असूनही आपल्या परिवारासाठी पेवेकर काम करत आहे. जगण्यासाठी प्रत्येकाला पैसा लागतंच असतो. मात्र, या पैशाची  आपणाला गरज असूनही त्यांनी त्याचा कोणताही लोभ न धरता ती सोन्याची माळ कुलकर्णी यांच्याकडे दिली. अन् आपला प्रामाणिकपणा दाखविला. सोन्याची माळ येथीलच असणाऱ्या किष्टी परिवाराची होती. त्यांना ती देण्यात आली.

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...

यावेळी किष्टी परिवाराने या सुरक्षारक्षकाला त्यांच्या प्रामाणिक पणामुळे बक्षीस देऊ केले. मात्र, पेवेकर यांनी नाकारले होते. पण जास्त आग्रहा खातर त्यांनी बक्षीस घेतले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे रुग्णालयाचे मालक व कर्मचारी तसेच महाराष्ट्र फ्रंटलाईन सिक्युरिटीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

मी महाराष्ट्र फ्रंटलाईन सिक्युरिटी आणि सर्व्हिसेस या कंपनीत सहा वर्ष झाले काम करत आहे. काम करत असताना आम्हाला प्रामाणिकपणे कसे काम करायचे हे शिकविले जात आहे. त्यामुळेच आम्ही येथे चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्याचेच हे फळ असल्याचे सुरक्षारक्षक पेवेकर यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security guard returns Rs 1.5 lakh gold in warje