पुण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची 2 हजार 929 घरांची सोडत कधी होणार पहा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 2 हजार 929 घरांची सोडत महिना अखेरपर्यंत्‌ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या योजनेअतेगत शहरात आठ हजारहून अधिक सदनिका उभारण्यात येणार आहेत.

पुणे - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 2 हजार 929 घरांची सोडत महिना अखेरपर्यंत्‌ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या योजनेअतेगत शहरात आठ हजारहून अधिक सदनिका उभारण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत महापालिकेच्या हद्दीतही ज्यांचे कुठेही घर नाही, अशा नागरीकांना महापालिकेकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी मध्यंतरी महापालिकेने अर्ज मागविले होते. सुमारे पन्नास हजारांहून अधिक नागरिकांनी महापालिकेकडे घरासाठी अर्ज केला आहे. पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यात सुमारे आठ हजार सदनिका बांधण्यांचे नियोजन केले आहे.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

त्यानुसार हडपसर स.नं. 106 अ, खराडी येथील स.नं. 57, आणि वडगाव खुर्द येथील स.नं. 39 येथे इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. खराडी येथील काम पाचव्या मजल्यापर्यंत पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी पाहण्यासाठी सॅंपल फ्लॅट नागरीकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

Breaking : मुसळधार पावसाचा फटका; पुणे विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले

योजनेअंतर्गत महापालिकेकडे अर्ज केलेल्या आणि त्यामध्ये पात्र ठरलेल्या नागरिकांना या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. या सदनिकांसाठी जवळपास 20 हजारापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या सदनिकांसाठी डिसेंबर 2019 मध्ये ऑनलाईन सोडत काढण्यात येणार होती. मात्र कार्यक्रम काही कारणांमुळे रद्द करण्यात आला होता. आता ही सोडत या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. महापौरांशी चर्चा करून लवकरच सोडतची तारीख जाहीर करण्यात येणार आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

Video:पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहत होतं पाणी; रात्री उशिरा पावसाची विश्रांती

 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See 2929 houses of Pradhan Mantri Awas Yojana vacated in Pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: