युरोपात सर्वाधिक गुलाब निर्यात; फुलाला मिळाला किती भाव पहा

ज्ञानेश्‍वर वाघमारे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

एक गुलाब २५ रुपयांना
वाशी - ‘व्हॅलेंटाईन’च्या पार्श्‍वभूमीवर लाल गुलाबांची मागणी वाढली आहे; तर मागणीइतका पुरवठा होत नसल्याने फुलांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात या फुलांच्या २० नगास १६० रुपये; तर किरकोळ बाजारात एका फुलास २५ ते ३० रुपये दर मिळत आहे. राज्यातील नागपूर, पुणे येथून; तर गुजरातमधील सुरत, बडोदा; मध्य प्रदेशातील इंदोर; हैदराबाद येथून दिल्ली येथे फुले पाठवली जात आहेत.

वडगाव मावळ (जि. पुणे) - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून सुमारे ४५ ते ५० लाख फुलांची निर्यात झाली असून, स्थानिक बाजारपेठेतही सुमारे ५० ते ५५ लाख फुले विकली गेली आहेत. त्यातून सुमारे पंधरा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यंदा फुलांचा तुटवडा निर्माण होऊनही भाव चांगला मिळाल्याने फूल उत्पादकांची मंदीतही चांदी झाल्याचे दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुले निर्यातीला २६ जानेवारीपासून सुरुवात झाली. मंगळवारी (ता. ११) शेवटची निर्यात झाली. पंधरा दिवसांच्या कालावधीत सुमारे ४५ ते ५० लाख फुलांची निर्यात झाली. सर्वांत जास्त सुमारे ८० ते ८५ टक्के निर्यात युरोपमध्ये झाली. परदेशात प्रति फुलाला १२ ते १५ रुपये भाव मिळाला. निर्यात व स्थानिक मिळून यंदा सुमारे पंधरा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज उत्पादकांनी व्यक्त केला आहे. यंदा लांबलेला पावसाळा, ढगाळ हवामान व गायब झालेली थंडी, या कारणांमुळे उत्पादनात घट झाली. फुलांचा तुटवडा निर्माण झाल्याने फूल उत्पादकांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात व स्थानिक बाजारपेठेतही कमी माल गेला. परंतु, भाव समाधानकारक मिळाल्याने त्यांची मंदीतही चांदी झाली. 

सविताभाभी...तू इथंच थांब! पुण्यातील होर्डिंगची चर्चा

प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनाचे नियोजन कोलमडल्याने यंदा चिंतेचे वातावरण होते. परंतु, चांगल्या भावामुळे उत्पादकांत समाधानाचे वातावरण आहे,’’ अशी माहिती पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे व तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव मल्हार ढोले यांनी दिली.

Video : भन्नाट! अशी लग्नपत्रिका पाहिलीच नसेल; एकदा बघाच!

स्थानिक बाजारपेठांमध्ये खाल्ला ‘भाव’
काही फूल उत्पादकांनी स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य दिले. तीन दिवसांत सुमारे ५० ते ५५ लाख फुले विक्रीला गेली. त्यात प्रामुख्याने दिल्ली, भोपाळ, जयपूर, लखनौ, इंदूर, अहमदाबाद, चंदीगड आदी शहरांचा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठेत प्रति फुलाला दहा ते बारा रुपये भाव मिळाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See how much prices the highest rose export flower received in Europe