Video : भन्नाट! अशी लग्नपत्रिका पाहिलीच नसेल; एकदा बघाच!

 A  Family made Wedding card which gives environmental message
A Family made Wedding card which gives environmental message

पुणे : सध्या लग्नांचा सिझन सुरू आहे, वेगवेगळ्या आकर्षक  लग्नपत्रिका आपण पाहतो मात्र कधीना कधी या पत्रिका रद्दीमध्ये जमा होत असतात, मात्र अशी हटके पत्रिका तुम्ही पाहिली नसेल. ही पत्रिका तुम्ही चुकूनही रद्दीत टाकणार नाही,कारण ही पत्रिका आहे पर्यावरपूरक, म्हणजे यात केवळ पर्यावरण पूरक संदेशच नव्हे तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड दिलीय, चला तर बघूया ही भन्नाट लग्नपत्रिका

अरे कारट्या काय केलंस हे! खेळता खेळता मुलानेच आईला...



आपल्याकडे सहसा लग्नसोहळ्यात चर्चा होते ती महागडे कपडे, दागदागिने, मानपान, जेवणाचा मेनू आणि अशा बऱ्याच गोष्टींची, मात्र याच लग्नसोहळ्यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लग्नपत्रिका,  प्रत्यक्ष या पत्रिका तयार करणाऱ्या एका कुटुंबाने अनोखी अशी पर्यावरणपूरक पत्रिका तयार केलीय, या लग्नपत्रिकेत चक्क तुळशीचे बी मिसळले आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर पत्रिका टाकून देण्याऐवजी त्या मातीत पुरल्या तर रोपे येतील. 

हात सोडून 'बाईक' चालवणे जिवावर बेतले:दोन तरुणांचा मृत्यू 
 
हे कुटुंब खरे तर मूळचे विदर्भातले आहे. पण व्यवसायाच्या निमित्ताने ते पुण्यात स्थायीक झाले आहेत. डीटीपी'च्या व्यवसायात त्यांनी हजारो पत्रिका बनवल्या पण 'झाडे जगवा, झाडे वाचवा' या पलीकडे त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा होती. त्याच विचारातून त्यांनी बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या इको-फ्रेंडली कागदाचा वापर केला आहे. विदर्भातील कडक उन्हाळा ते नेहमी अनुभवतात, त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांनी भर दिला,

पुणे : नवी पेठेत रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग 

'' 'झाडे लावा, झाडे जगवा' या थीमवर आधारित लग्नाची पत्रिका, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे असं कायमच कव्हर कुटुंबाला वाटत होतं, त्यामुळे त्यांनी लग्नसोहळ्याच्या निमित्ताने लोकांचे प्रबोधन व्हावे. यासाठी त्यांनी हा छोटा प्रयत्न केला.
 अनेकदा वृक्षसंवर्धनाचे संदेश त्यांनी अनेकांच्या पत्रिकेवर लिहिले आहेत मात्र, यावेळी प्रत्यक्ष कृती करायचे ठरवले आणि सिड पेपर लग्नपत्रिका तयार झाली.
- दिनेश कव्हर, भाऊ संकल्पना सुचवणारे

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

''अशी ही आगळी वेगळी लग्न पत्रिका फेकून न देता झाडांच्या रूपाने त्याच्या स्मृती कायमस्वरूपी टिकू शकतील, एवढं मात्र नक्की''
- निलेश कव्हर, नवरा मुलगा

'तो' विमानाने पुण्यात यायचा अन् चोरी करुन जायचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com