महत्वाची बातमी : कोरोना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत ज्योतिषबुवा म्हणतात... 

kkk.jpg
kkk.jpg
Updated on

पुणे : मंगळाची मकर राशीत शनि आणि फ्लूटो सोबत झालेली युती जगावर कोरोनाचे गूढ संकट घेऊन आली. ही परिस्थिती २१ मेपासून हळूहळू कमी होईल, पण बिघडलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागेल, असे भाकीत ज्योतिषांनी केले आहे.

कोरोनाने संपूर्ण जग हादरले आहे. आत्तापर्यंत हजारो बळी या महामारीने घेतले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी एका बाजूला शास्त्रज्ञ, वैद्यकशास्त्र रात्रंदिवस प्रयत्न करीत असताना ज्योतिषीही त्यावर अभ्यास करीत आहेत. 

हे संकट कधी दूर होईल याचा अंदाजही ज्योतिषांनी वर्तविला आहे.  पुण्यातील ज्योतिष अभ्यासक विजयकुमार स्वामी यांच्या अभ्यासानुसार कोरोनाच्या संकटावर भारत लवकरच मात करेल. ते म्हणाले की, देशात मे महिन्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसेल. 20 मे रोजी राहू अद्रा या नक्षत्रातून मृग नक्षत्रात जात असल्याने पृथ्वीवरील नकारात्मक लुप्त विषाणूची शक्ती कमी होईल.

सध्या शनी-मंगळ या पाप ग्रहांची युती मानवजातीला बाधक ठरल्याचे दिसते. 20 जानेवारी 2020 रोजी शनिचा मकर या वायूत्वाच्या चरराशीत प्रवेश झाला. 8 फेब्रुवारी 2020 रोजी फ्लूटोची  शनि सोबत युती झाली व 22 मार्च रोजी अग्नितत्वाच्या मंगळाची मकर राशीत शनि आणि फ्लूटोसोबत झालेली युती गुढ संकट घेऊन आली. मकर ही रास पृथ्वीतत्वाची असून, शनी पृथ्वी आणि वायूतत्वाचा मारक असल्याने एकूण हवाच प्रदूषित झाल्याचे दिसते. प्रत्येकाला मास्क लावून फिरावे लागत आहे. 20 में नंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात राहील आणि 17 ऑगस्टनंतर देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल. 

"22 मार्च ते 3 मे याकाळात मंगळ आणि फ्लूटो, शनीची युती होती म्हणून भारताला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. 29 जूनला गुरुमहाराज धनु राशीत येणार असल्याने संकटाचे मळभ दूर होईल, अशी ग्रहस्थिती दर्शवते. "

ग्रहस्थिती बदलेपर्यंत प्रत्येकाने नियमांचे पालन करुनच काम करायला हवे. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, स्वच्छतेची काळजी ही पथ्ये पाळली तर संकटाच्या या काळातून सुरक्षितपणे बाहेर पडणे शक्य होईल, असेही विजयकुमार स्वामी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com