पुणे-सातारा महामार्गावर नव्याने बदल, काय आहे तो पाहा...

pune-satara.jpg
pune-satara.jpg
Updated on

नसरापूर : संघर्ष समिती व लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्ग दुरुस्तीच्या कामाने वेग घेतला असून, महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी उड्डाण पुलाची कामेदेखील दिवसरात्र सुरू आहेत.

 दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांनी जिल्हाधिकारी व संघर्ष समिती लोकप्रतिनिधी यांना तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीबरोबरच रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामासदेखील सुरुवात करण्यात येईल, असे सांगून काम पूर्ण होण्याच्या तारखा दिलेल्या आहेत. त्यानुसार पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या पुणे-सातारा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे व उखडलेला रस्ता पुन्हा करण्याचे काम रिलायन्स इन्फ्राने तातडीने सुरू केले आहे.

नसरापूर येथील कामाची अंतिम तारीख 19 डिसेंबर देण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी गठित केलेल्या समितीने 19 तारखेलाच सायंकाळी कामाची पाहणी केली, मात्र काम काही प्रमाणातच झाले होते. समितीने त्याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यावर तातडीने 20 तारखेला सकाळीच काम पुन्हा सुरू करून वाहतूक वळवलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे खड्डे बुजवून डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

याबरोबरच नसरापूरच्या उड्डाण पुलाचे कामदेखील वेगात सुरू असून, अतिरिक्त मनुष्यबळ वापरून रात्रंदिवस काम करण्यात येत आहे. या पुलाची पुणे-सातारा लेन प्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी उड्डाण पुलाचे कठडे बांधणे, दोन्ही बाजूचा भराव भरून घेणे आदी कामे वेगात सुरू करण्यात आली आहेत.

पुलाची एक बाजू 20 जानेवारी 2020 पर्यंत पूर्ण करून तेथून वाहतूक सुरू करून या भागात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न राहणार आहे. याच वेगात काम सुरू ठेवून दुसरी बाजू पुढील पंचवीस दिवसांत म्हणजे 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 

वाहतुकीमुळे कामात अडथळे येत आहेत, तरीदेखील या महामार्गावरील नसरापूर या ठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्यात येऊन ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण उखडलेला होता, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने डांबरीकरण केले आहे. तर, वरवे व सारोळा येथील डायव्हर्शन रस्त्याचेदेखील खड्डे बुजविले आहेत. येत्या दोन दिवसांतच त्यावर डांबरीकरणाचा थर दिला जाईल. उड्डाण पुलांची कामेदेखील रात्रंदिवस सुरू असून, दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' 
- अमित भाटिया, व्यवस्थापक, रिलायन्स इन्फ्रा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com